'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवर तेजस्वी प्रकाशला झाली दुखापत, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:10 IST2024-12-30T09:09:51+5:302024-12-30T09:10:20+5:30

Tejasswi Prakash: अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिला सेलिब्रिटी मास्टरशेफच्या सेटवर दुखापत झाल्याचे सांगितले आहे.

Tejasswi Prakash injured on the set of 'Celebrity MasterChef', photo goes viral | 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवर तेजस्वी प्रकाशला झाली दुखापत, फोटो होतोय व्हायरल

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या सेटवर तेजस्वी प्रकाशला झाली दुखापत, फोटो होतोय व्हायरल

छोट्या पडद्यावरील नागिन म्हणजेच अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. ती बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच ती 'सेलिब्रेटी मास्टरशेफ' या शोमध्ये सहभागी झाली होती. या सेटवर तिला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

तेजस्वी प्रकाश आगामी शो 'सेलिब्रेटी मास्टरशेफ'च्या शूटिंगदरम्यान जखमी झाली. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना याची माहिती दिली. तिने रविवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिच्या हातावर भाजल्याची खूण आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले, “शो मस्ट गो ऑन.” 

तेजस्वी 'नागिन ६' या शोमध्ये तिच्या यशस्वी कामगिरीनंतर काही काळानंतर टेलिव्हिजनवर परतण्याची तयारी करत आहे. 'स्वरागिनी- जोड रिश्तों के सूर' मधील भूमिकेमुळे अभिनेत्रीला खूप लोकप्रियता मिळाली आहे. २०२१ मध्ये, तिने बिग बॉस १५ या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि ती विजेती म्हणून उदयास आली. 'मन कस्तुरी रे' या चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शो

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा लाफ्टर शेफसारखा स्वयंपाकावर आधारित रिॲलिटी शो आहे. दीपिका कक्कर इब्राहिम, गौरव खन्ना, निक्की तांबोळी, राजीव अदातिया आणि इतर अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी या शोमध्ये तेजस्वीसोबत सामील होणार आहेत. निर्मात्यांनी या शोचे प्रोमो सोशल मीडियावर आधीच रिलीज केले आहेत. नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शिका फराह खानला पाककला आधारित रिॲलिटी शो 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चे होस्ट म्हणून निवडण्यात आले आहे. फराहने पाककृतींमध्ये प्रयोग करण्याची आणि नवीन पदार्थ शोधण्याची तिच्या आवडीबद्दल खुलासा केलाय.

Web Title: Tejasswi Prakash injured on the set of 'Celebrity MasterChef', photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.