'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये तेजस्वी प्रकाश ढसाढसा रडली, का ते घ्या जाणून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:36 IST2025-02-11T09:35:49+5:302025-02-11T09:36:46+5:30

Tejasswi Prakash : गेल्या आठवड्यात चंदन प्रभाकरला शोमधून बाहेर काढण्यात आले होते, तर अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये कठोर परिश्रम करावे लागले कारण ती सध्या शेवटच्या स्थानावर आहे.

Tejasswi Prakash cried profusely on the show 'Celebrity MasterChef', why should we know? | 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये तेजस्वी प्रकाश ढसाढसा रडली, का ते घ्या जाणून?

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' शोमध्ये तेजस्वी प्रकाश ढसाढसा रडली, का ते घ्या जाणून?

'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (Celebrity MasterChef) शो आता तिसऱ्या आठवड्यात आला आहे आणि दिवसेंदिवस हा शो अधिक कठीण होत आहे. हा शो स्पर्धकांसाठी जितका आव्हानात्मक आहे तितकाच तो प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक बनत चालला आहे. गेल्या आठवड्यात चंदन प्रभाकरला शोमधून बाहेर काढण्यात आले होते, तर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash)ला सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये कठोर परिश्रम करावे लागले कारण ती सध्या शेवटच्या स्थानावर आहे. आता आणखी एक प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यावरून त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येते.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या निर्मात्यांनी या शोचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जज पॅनेलमध्ये शेफ विकास खन्ना, शेफ रणवीर ब्रार आणि फराह खान यांचा समावेश असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. शोमध्ये ते एक मिस्ट्री बॉक्स दाखवत आहेत. त्या बॉक्सची किंमत ३१ लाख रुपये असून त्यात काही वस्तूही ठेवण्यात आल्याचे जजनी सांगितले. प्रत्येक वस्तूची किंमत ११००० रुपयांपासून ते ६.५ लाख रुपयांपर्यंत आहे.

तेजस्वी प्रकाश झाली भावुक
याच प्रोमोमध्ये तेजस्वी प्रकाश शोमध्ये भावूक होताना दिसली. स्पर्धकांनी मिस्ट्री बॉक्सनुसार आपापल्या डिशेस तयार केल्याचे क्लिपमध्ये दाखवण्यात आले होते. मात्र, जेव्हा तेजस्वीने तिची डिश सादर केली तेव्हा परिक्षकांना ती आवडली नाही आणि ती रडू लागली. प्रोमोमध्ये तेजस्वी तिच्या डिशची किंमत २००० रुपये असल्याचे सांगते. मात्र, फराह खान या डिशवर समाधानी नव्हती आणि तिने यासाठी इतके पैसे देणार नसल्याचे सांगितले.

आयेशा जुल्का यांची वाइल्डकार्ड एन्ट्री
निर्मात्यांनी शेअर केलेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये अभिनेत्री आयेशा जुल्का वाइल्डकार्ड म्हणून शोमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. आयेशा म्हणाल्या, 'लहानपणापासून स्वयंपाक करणे हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि मला अन्नावर प्रयोग करण्यात आनंद मिळतो. सेलिब्रिटी मास्टरशेफवर असणे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आव्हान आहे आणि ते कसे होते हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.

Web Title: Tejasswi Prakash cried profusely on the show 'Celebrity MasterChef', why should we know?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.