तेजश्री प्रधान वैभव तत्त्ववादीला म्हणतेय, काहीही हा वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 13:53 IST2017-02-25T08:23:37+5:302017-02-25T13:53:37+5:30

होणार सून मी या घरची या मालिकेत तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर झळकले होते. या कार्यक्रमातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना ...

Tejashri Pradhan Vaibhav says to the philosopher, Nothing | तेजश्री प्रधान वैभव तत्त्ववादीला म्हणतेय, काहीही हा वी

तेजश्री प्रधान वैभव तत्त्ववादीला म्हणतेय, काहीही हा वी

णार सून मी या घरची या मालिकेत तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर झळकले होते. या कार्यक्रमातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या कार्यक्रमात तिचे शंशाकला म्हणजेच या मालिकेतील श्री या व्यक्तिरेखेला काहीही हा श्री म्हणणे खूपच गाजले होते. यावर अनेक जोक्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज ही मालिका संपून कित्येक महिने झाले असले तरी तेजश्रीचे काहीही हा श्री बोलणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 
तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेत काम केल्यानंतर ती छोट्या पडद्यावर झळकली नव्हती. ती या मालिकेनंतर ती सध्या काय करते या चित्रपटाच्या चित्रीकरणात आणि मैं और हम या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र होती. पण आता तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार आहे. प्रेम हे या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.
प्रेम हे या मालिकेत तेजश्रीसोबत वैभव तत्त्ववादीदेखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. वैभवने तुझे माझे जमेना या मालिकेत काम केले होते. पण नंतर बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटात आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने तोदेखील दोन-तीन वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर राहिला होता. पण आता तोदेखील छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 
तेजश्री आणि वैभवने प्रेम हे या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या मालिकेतील चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची खूपच चांगली मैत्री झाली असल्याचे म्हटले जात आहे. तेजश्री मालिकेच्या सेटवर काहीही हा वी असे म्हणत त्याला चिडवत असल्याचेदेखील कळतेय. 

Web Title: Tejashri Pradhan Vaibhav says to the philosopher, Nothing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.