तुम्ही लग्न करा ना प्लीज..! तेजश्री प्रधान-आशुतोष पत्कीचा फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 15:06 IST2021-06-03T14:43:13+5:302021-06-03T15:06:04+5:30

तेजश्री आणि आशुतोषचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावर चाहते सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

tejashri pradhan and ashutosh patki photo viral on social media, fans get crazy | तुम्ही लग्न करा ना प्लीज..! तेजश्री प्रधान-आशुतोष पत्कीचा फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

तुम्ही लग्न करा ना प्लीज..! तेजश्री प्रधान-आशुतोष पत्कीचा फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

ठळक मुद्दे ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत तेजश्री व आशुतोष दोघांनी एकत्र काम केले होते.

अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील शुभ्रा अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकताच वाढदिवस साजरा केला. 2 जूनला तेजश्रीचा वाढदिवस दणक्यात साजराही झाला. तेजश्रीला अनेकांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडियावर तेजश्रीसाठी खास पोस्टही शेअर केल्या गेल्यात. यातल्याच एका पोस्टने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. होय, ही पोस्ट होती अभिनेता आशुतोष पत्कीची.
आशुतोषने तेजश्रीसोबतचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होता. आशुतोषची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतेय.

‘माझी बेस्ट फ्रेंड.. मला तुला सांगायचे आहे की तू माझ्यासाठी खूप काही आहेस. मला सतत प्रोत्साहन देण्यासाठी, मला सतत पाठींबा देण्यासाठी शिवाय एक चांगला व्यक्ती आणि एक उत्तम अभिनेता होण्यासाठी तू केलेल्या मदतीसाठी तुझे खूप खूप आभार,’ असे आशुतोषने ही पोस्ट शेअर करताना लिहिलेय. शिवाय तेजश्रीला काही टीप्सही दिल्या आहेत.
त्याने लिहिले,‘वाढदिवशी तुला दोन टीप्स देईन... पहिली म्हणजे भूतकाळ विसरून जा, कारण तू तो बदलू शकत नाही. दुसरी म्हणजे, गिफ्टबद्दलही विसर, कारण मी तुझ्यासाठी ते घेतलंच नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा...

तेजश्री आणि आशुतोषचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यावर चाहते सध्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आशुतोष व तेजश्री फक्त बेस्ट फ्रेंड आहेत. पण ही पोस्ट वाचून चाहत्यांनी मात्र वेगळाच अंदाज बांधणे सुरु केले आहे. इतकेच नाही तर एका युजरने चक्क तुम्ही लग्न करा ना प्लीज, निदान तेजू दी तरी खूश राहिल,अशी प्रेमळ विनंती केली आहे. खूप छान जोडी आहे तुमची, आम्हाला नवीन घोषणा ऐकायला मिळेल का? अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

 ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत तेजश्री व आशुतोष दोघांनी एकत्र काम केले होते. तेजश्रीने शुभ्रा साकारली होती तर आशुतोषने बबड्याची भूमिका जिवंत केली होती. शुभ्रा व बबड्याच्या या जोडीला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले होते.  ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण शुभ्रा आणि बबड्या या व्यक्तिरेखा चाहत्यांच्या मनात घर करून आहेत.

Web Title: tejashri pradhan and ashutosh patki photo viral on social media, fans get crazy