तेजश्री प्रधान सांगतेय, फॅन्सची ही गोष्ट मला आवडत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 06:30 IST2019-03-30T06:30:00+5:302019-03-30T06:30:02+5:30

कानाला खडा या मालिकेच्या शनिवारच्या भागात अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे तेजश्री महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली.

Tejashree Pradhan doesn't like to take selfie reveals in zee marathi kanala khada | तेजश्री प्रधान सांगतेय, फॅन्सची ही गोष्ट मला आवडत नाही

तेजश्री प्रधान सांगतेय, फॅन्सची ही गोष्ट मला आवडत नाही

ठळक मुद्देदोन तास एक नाटक सादर केल्यानंतर प्रेक्षक आमच्यासोबत सेल्फी काढायला येतात. त्यांचं प्रेम मी समजू शकते... पण येऊन सेल्फी काढून ते निघून जातात. आम्ही दोन तास त्यांच्यासाठी एक कलाकृती सादर केली त्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत नाही.

झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. या कार्यक्रमात आपल्याला आजवर स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, अनिता दाते, प्रिया बेर्डे यांसारख्या अनेक कलाकारांचे किस्से जाणून घेता आले आहे. या कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से या कार्यक्रमाद्वारे आपल्याला जाणून घेता आले होते.

कानाला खडा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काहीच महिने झाले असले तरी या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवनवीन आणि भन्नाट किस्स्यांमुळे रंगणाऱ्या या मैफिलीने तो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडला आहे.

कानाला खडा या मालिकेच्या शनिवारच्या भागात अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे तेजश्री महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यापुढील तिची अभिनय क्षेत्रातील यशस्वी कारकिर्द आपण सर्व पाहतच आहोत. ती सध्या काय करते या चित्रपटात तर तेजश्रीने अफलातून अभिनय केला होता. तिचा आतापर्यंतचा प्रवास आणि तिला वाटणाऱ्या काही खंत तिने या कार्यक्रमात सगळ्यांसमोर मांडल्या आहेत. एक अभिनेत्री म्हणून तेजश्रीला सेल्फी काढणे आवडत नसल्याचं तिने सांगितलं. "दोन तास एक नाटक सादर केल्यानंतर प्रेक्षक आमच्यासोबत सेल्फी काढायला येतात. त्यांचं प्रेम मी समजू शकते... पण येऊन सेल्फी काढून ते निघून जातात. आम्ही दोन तास त्यांच्यासाठी एक कलाकृती सादर केली त्याबद्दलची प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत नाही. ते फक्त सेल्फीसाठीच येतात की काय असं वाटतं आणि त्यामुळे माझ्यातील कलाकार कुठेतरी हळहळतो. म्हणून मी सेल्फीवर नाराज आहे." असं तेजश्री सांगते. 

तेजश्रीने तिच्या कारकिर्दीत कशाला कानाला खडा लावला हे प्रेक्षकांना कानाला खडा या कार्यक्रमात शनिवारी रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Tejashree Pradhan doesn't like to take selfie reveals in zee marathi kanala khada