तेजस बर्वे दिसणार जिंदगी नॉट आउटमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 20:59 IST2017-08-04T09:21:39+5:302017-08-04T20:59:27+5:30
मायेची ऊब देणारी आई... आधाराचा हात पाठीवर ठेवणारे वडील.... लुटूपुटूच्या भांडणातही आनंद शोधणाऱ्या बहिणी... कुटुंबात जेव्हा अशा नात्याचे बंध ...
.jpg)
तेजस बर्वे दिसणार जिंदगी नॉट आउटमध्ये
म येची ऊब देणारी आई... आधाराचा हात पाठीवर ठेवणारे वडील.... लुटूपुटूच्या भांडणातही आनंद शोधणाऱ्या बहिणी... कुटुंबात जेव्हा अशा नात्याचे बंध एकमेकांसोबत दृढपणे बांधलेले असतात तेव्हा डोळ्यात सामावलेली आकाशाएवढी स्वप्न पूर्ण करण्याची हिमंत मिळत असते. आयुष्यातील प्रत्येक संकट परतवून लावण्याची धमक त्यामुळे येते. कुटुंबातील एका व्यक्तीच्या डोळ्यातील स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जेव्हा सगळ्यांची साथ मिळते तेव्हा त्या स्वप्नपूर्तीलाही वेगळेच तेज येते. याच भावविश्वावर आधारित जिंदगी नॉट आउट ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
बाबांची चप्पल मुलाच्या पायात चपखल बसायला लागली की दोघांनी मैत्रीची गाठ बांधावी तर मुलगी अवखळ वयाच्या उंबरठ्यावर आली की मायलेकींपेक्षा मैत्रीणीचे नाते तयार व्हावे. तसेच पाठच्या भावंडांमध्येही अशीच मनाचे कप्पे मोकळे करणारी मैत्री फुलावी असे म्हटले जाते. कौटुंबिक नात्यातील ही प्रत्येक छटा जिंदगी नॉट आउट या मालिकेत अनुभवता येणार आहे. कुटुंबाची सर्वात मोठी ताकद असते ते एकमेकांमधील भावनिक बंध. यशाचे शिखर असो किंवा अपयशाची ठेच... संघर्षाचे चटके असोत किंवा स्वप्नपूर्तीचा प्रवास... यामध्ये कुटुंबाची साथ असेल तर कोणतीही खडतर गोष्ट सोपी होते हे दाखवणारी मालिका म्हणजे 'जिंदगी नॉट आउट'.
२१ वर्षाच्या सचिन देसाई या मुलाचे क्रिकेट या खेळावरील प्रेम आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेले त्याचे कुटुंब आपल्याला पाहायला मिळेल. सचिनच्या या स्वप्नात येणाऱ्या अडचणी आणि त्याला संपूर्ण कुटुंब कसे तोंड देते हे पाहताना नकळतपणे आपल्याला आपल्या कुटुंबाची नव्याने ओळख होईल. या मालिकेमध्ये शैलेश दातार, वंदना वाकनीस, तेजस बर्वे, ज्ञानदा रामतीर्थकर, नेहा अष्टपुत्रे, सायली झुरळे, तेजश्री वालावलकर, स्वप्नील फडके, उज्वला जोग, प्रसन्ना केतकर, सिद्धीरूपा करमरकर, अथर्व नकती, राहुल मेहेंदळे, आदिश वैद्य असे अनेक कलाकार आहेत.
"जिंदगी नॉट आउट “या मालिकेची निर्मिती महेश तागडे, जितेंद्र गुप्ता यांच्या टेल अ टेल मीडिया या निर्मिती संस्थेने केली आहे. जितेंद्र गुप्ता, किरण कुलकर्णी, पल्लवी करकेरा यांच्या लेखणीतून आकाराला आलेली जिंदगी नॉट आउट ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.