n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">झलक दिखला जा या कार्यक्रमात प्रेक्षकांना एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. सुरवीन चोप्रा ही खूपच चांगली डान्सर आहे. तिने तिच्या परफॉर्मन्समधून हे सिद्धदेखील केले आहे. तिने नुकतेच प्रियांका चोप्रा आणि रणबीर कपूरवर चित्रीत झालेल्या इतनी सी खूशी या गाण्यावर नृत्य सादर केले. या तिच्या परफॉर्मन्ससाठी सगळ्यांनीच तिचे खूप कौतुक केले. सुरवीनचा परफॉर्मन्स पाहून जॅकलिन फर्नांडिसला तर तिचे अश्रू आवरलेच नाहीत. सुरवीन ही खूप चांगली डान्सर असून तिचे नृत्य पाहिल्यावर मी या कार्यक्रमाचे परीक्षण करत असल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे असे जॅकलिन सांगते.