थुकरट वाडीमध्ये येणार ‘३१ दिवस’ सिनेमाची टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 21:00 IST2018-07-07T13:16:06+5:302018-07-07T21:00:00+5:30

शशांकच्या 'श्री' या व्यक्तिरेखेने आणि त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने त्याने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. श्री आता मराठी सिनेमातून कम बॅक करत आहे.

The team of '31 Days' movie coming to Thakurat Wadi | थुकरट वाडीमध्ये येणार ‘३१ दिवस’ सिनेमाची टीम

थुकरट वाडीमध्ये येणार ‘३१ दिवस’ सिनेमाची टीम

ठळक मुद्देचला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली आहे

महाराष्ट्रातील तमाम जनतेला ज्या मालिकेने प्रेमाचा वर्षाव करायला भाग पाडलं अशा ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील लोकप्रिय 'श्री' ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता शशांक केतकर लवकरच ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हजेरी लावणार आहे. शशांकच्या 'श्री' या व्यक्तिरेखेने आणि त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने त्याने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. श्री आता मराठी सिनेमातून कम बॅक करत आहे. त्याचा ‘३१ दिवस’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शशांकने हजेरी लावली ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर. 

चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजवर अनेक सुप्रसिद्ध बॉलिवूड मंडळींनी हजेरी लावली आहे. झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आगामी मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी या मंचावर हजेरी लावणे सर्व कलाकारांना गरजेचे वाटते.  संवेदनशील अशा विषयावर आधारित ‘३१ दिवस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शशांक केतकरने थुकरटवाडीची वाट धरली. यावेळी या चित्रपटातील शशांकची सहअभिनेत्री म्हणजेच खुलता कळी खुलेना फेम मयुरी देशमुख आणि अभिनेत्री रीना अगरवाल देखील त्याच्यासोबत उपस्थित होत्या. ३१ दिवस चित्रपटाच्या टीमसोबत थुकरटवाडीच्या मंडळींनी एकच धम्माल उडवून दिली आणि या सर्वाला 'श्री'ने खळखळून दादही दिली. एकंदरीत धम्माल मजा मस्तीसोबतच एका संवेदनशिल विषयावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. 

Web Title: The team of '31 Days' movie coming to Thakurat Wadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.