'तारक मेहता' फेम बबिता आणि शोलेतील कालियाचं आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 15:09 IST2021-11-18T15:09:41+5:302021-11-18T15:09:57+5:30

नुकतेच मुनमुनने काही फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

'Taraq Mehta' fame Babita and Kalia from the school have a special connection | 'तारक मेहता' फेम बबिता आणि शोलेतील कालियाचं आहे खास कनेक्शन

'तारक मेहता' फेम बबिता आणि शोलेतील कालियाचं आहे खास कनेक्शन

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो तारक मेहता का उल्टा चश्मा फेम बबिताजी उर्फ मुनमुन दत्ताने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. मुनमुन दत्ताचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे.  चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मुनमुन नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करते. नुकतेच मुनमुनने काही फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. 

बऱ्याचदा आपण जुन्या आठवणींमध्ये रमतो. असेच काहीसे अभिनेत्री मुनमुन दत्ताचे झाले आहे. मुनमुन नुकतीच नव्या घरात राहायला गेली आहे. यावेळी सामान आवरत असताना तिला तिचे स्वतःचे काही जुने फोटो सापडले. ते फोटो तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका फोटोत ती 'शोले' चित्रपटातील कालियासोबत दिसत आहे. फोटोमध्ये दोघे एकत्र दिसत आहे. याशिवाय तिने अभिनयाचा प्रवास करताना आलेल्या आठवणींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. 


फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नवीन अपार्टमेंटमध्ये आवरा-आवर करत असताना या जुन्या आठवणी एका सुटकेसमध्ये बंद केलेल्या आढळल्या. मला आयुष्यात आलेल्या या सर्व अनुभवांसाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. इतकेच नाहीतर तिने चाहत्याचे आभारदेखील मानले आहेत.

Web Title: 'Taraq Mehta' fame Babita and Kalia from the school have a special connection