'तारक मेहता...' मधील छोटी सोनू अडकणार विवाहबंधनात, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाइलमध्ये केलं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:07 IST2024-01-03T13:06:55+5:302024-01-03T13:07:36+5:30

'तारक मेहता' मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

tarak mehta ka ooltah chashmah fame actress jheel mehta bf propose her for wedding video viral | 'तारक मेहता...' मधील छोटी सोनू अडकणार विवाहबंधनात, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाइलमध्ये केलं प्रपोज

'तारक मेहता...' मधील छोटी सोनू अडकणार विवाहबंधनात, बॉयफ्रेंडने फिल्मी स्टाइलमध्ये केलं प्रपोज

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. या मालिकेतून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत छोटी सोनूची भूमिका साकारून अभिनेत्री झील मेहता घराघरात पोहोचली. 'तारक मेहता' मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली झील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. झीलच्या बॉयफ्रेंडने तिला फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज केलं आहे. 

झीलच्या बॉयफ्रेंडने तिच्यासाठी खास सरप्राइज प्लॅन केलं होतं. हटके अंदाजात प्रपोज करत त्याने झीलला लग्नाची मागणी घातली आहे. झीलने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत झीलचा बॉयफ्रेंड तिला प्रपोज करत असल्याचं दिसत आहे. याशिवाय झीलसाठी त्याने स्पेशल डान्सही केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. "कोई मिल गया, मेरा दिल गया", असं कॅप्शन झीलने या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

झीलने अनेक वर्ष 'तारक मेहता' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर शिक्षणासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर मात्र ती कोणत्याच मालिकेत दिसली नाही. झील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. 
 

Web Title: tarak mehta ka ooltah chashmah fame actress jheel mehta bf propose her for wedding video viral