'तारक मेहता'मधील टप्पू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार सुनील शेट्टीसोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 16:53 IST2024-09-13T16:52:45+5:302024-09-13T16:53:16+5:30
Bhavya Gandhi : तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये टप्पूची भूमिका साकारणारी भव्या गांधी लवकरच पुष्पा इम्पॉसिबल या नवीन शोमध्ये दिसणार आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलताना त्याने सांगितले की तो लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.

'तारक मेहता'मधील टप्पू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार सुनील शेट्टीसोबत
भव्या गांधी (Bhavya Gandhi) 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील टप्पूच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. आता लवकरच तो सोनी सबवरील नवीन मालिका पुष्पा इम्पॉसिबलमधून छोट्या पडद्यावर परतत आहे. या मालिकेत अभिनेता खलनायकाची भूमिका साकारणार आहे. भव्याला नव्या अवतारात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
जेव्हा भव्या गांधीला या मालिकेव्यतिरिक्त आगामी प्रोजेक्टबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की, “माझा गुजराती चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'ओम स्वीट ओम' या चित्रपटाचे अनेक भाग शूट करण्यात आले आहेत. मला आशा आहे की प्रेक्षकांना ते आवडेल. मी सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सूरज पांचोली यांच्यासोबत ‘केसरी वीर’ हा पीरियड चित्रपटही करत आहे.”
करिअरबद्दल अभिनेता म्हणाला...
भव्या गांधी म्हणाला की तो त्याच्या करिअरचा हा टप्पा एन्जॉय करत आहे. जिथे तो वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत असतो. याशिवाय, टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्याबद्दल तो उत्साहित आहे की चिंताग्रस्त आहे, असे विचारले असता, भव्या म्हणाला की, “मी खूप उत्साहित आहे. कारण मी एक अशी भूमिका करत आहे. माझे चाहते मला ज्यासाठी ओळखतात त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.”
भव्या गांधीने तारक मेहता का उल्टा चष्मा कधी सोडला?
अजब रात नी गजब वात हा कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सचा मिलाफ आहे. या चित्रपटात भव्य गांधी आणि आरोही पटेल पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. भव्या गांधीने २०१७ मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली. त्यानंतर, त्याने गुजराती इंडस्ट्रीत काम केले आणि आता तो पुष्पा इम्पॉसिबलमध्ये प्रभासची भूमिका साकारताना दिसणार आहे.