किचनमध्ये खरंच आहे लिफ्ट, अखेर तान्या मित्तलने ट्रोल करणाऱ्यांची बोलती केली बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:33 IST2025-12-18T15:24:07+5:302025-12-18T15:33:07+5:30
'बिग बॉस'मध्ये 'फेकू' म्हटलं गेलं, ती तान्या मित्तल निघाली कोट्यधीश!

किचनमध्ये खरंच आहे लिफ्ट, अखेर तान्या मित्तलने ट्रोल करणाऱ्यांची बोलती केली बंद
'बिग बॉस'चं १९ वं पर्व नुकतंच संपलं आहे. अखेर तान्या मित्तलही आता तिच्या ग्वाल्हेरच्या घरी पोहोचली आहे. घरी पोहोचल्यानंतर तान्यानं तिची श्रीमंती खरी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. शोमध्ये असताना घरातील सदस्यांनी आणि सोशल मीडियावरील प्रेक्षकांनी तान्याला 'फेकू' म्हटलं होतं. मात्र, शो संपल्यानंतर तान्याने आता आपल्या राजेशाही थाटाचे एकामागून एक पुरावे शेअर करायला सुरुवात केली असून, तिचं खरं घर पाहून आता सर्वजण थक्क झाले आहेत.
बिग बॉसच्या घरात असताना तान्याने तिच्या स्वयंपाकघरात अन्न वरच्या मजल्यावर नेण्यासाठी लिफ्ट असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा घरातील सदस्यांनी तिची टिंगल केली होती. पण तान्याने आता 'न्यूज पिंच'ला दिलेल्या होम टूरमध्ये ही लिफ्ट प्रत्यक्षात दाखवली आहे.
५-स्टार हॉटेलही फिकं पडेल असं घर!
'बिग बॉस'च्या घरात तान्याने आपल्या आलिशान बंगल्याबद्दल धक्कादायक खुलासे केले होते, जे आता खरे ठरत आहेत. तान्याच्या घरात फक्त कपड्यांसाठी २५०० चौरस फुटांचा एक संपूर्ण मजला आहे. प्रत्येक मजल्यावर ५ नोकर आणि एकूण ७ ड्रायव्हर तिच्या दिमतीला असतात. तान्याने तिचे स्वतःचे अनेक कारखाने असल्याचे पुरावे देखील सोशल मीडियावर दिले आहेत.