तन्वी आझमी वानी रानी या मालिकेत दिसणार या लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 17:09 IST2017-07-25T11:39:46+5:302017-07-25T17:09:46+5:30

वानी रानी या मालिकेत तन्वी आझमी प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी फॅमिली नंबर वन या मालिकेत काम केले ...

Tanvi Azmi Vani Rani will be seen in this series in the Look | तन्वी आझमी वानी रानी या मालिकेत दिसणार या लूकमध्ये

तन्वी आझमी वानी रानी या मालिकेत दिसणार या लूकमध्ये

नी रानी या मालिकेत तन्वी आझमी प्रेक्षकांना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यांनी फॅमिली नंबर वन या मालिकेत काम केले होते. त्यांची ही मालिका प्रचंड गाजली होती. आता त्या 10 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. 
वानी रानी या मालिकेत प्रेक्षकांना दोन जुळ्या मुलींची कथा पाहायला मिळणार आहे. या बहिणींची लग्नंही एकाच घरात सख्ख्या भावांशी झाली आहेत. त्या जुळ्या असल्या तरी त्यांच्यामध्ये काहीच साम्य नाहीये. वानी करिअरला प्राधान्य देणारी एक खंबीर स्त्री आहे तर रानी काहीशी साधी आणि नेहमी घरातल्या मंडळींना प्राधान्य देणारी आहे. वानी आणि रानी या दोन्ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अगदी खऱ्याखुऱ्या वाटाव्यात यासाठी तन्वी आझमी सध्या मेहनत घेत आहेत. 
कोणताही चित्रपट अथवा मालिका असो चित्रपटातील अथवा मालिकेतील व्यक्तिरेखा काय कपडे घालणार, तिचा गेटअप कशा पद्धतीने असणार हे स्टायलिस्ट ठरवतात आणि त्याप्रकारे ते कपडे डिझाइन करून घेतात. पण या मालिकेसाठी तन्वी आझमी यांनी काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले आहे. त्यांनी या मालिकेसाठी साड्या कोणत्याही डिझायनरकडून बनवून घेतलेल्या नाहीत. या व्यक्तिरेखा अतिशय साध्या आणि खऱ्या दिसाव्यात यासाठी त्यांनी मुंबईतील स्थानिक दुकानातून या साड्या कॉश्च्युम डिझायनरला घ्यायला लावल्या आहेत. राणी ही अतिशय साधी दाखवली असल्याने तिच्या साड्या तर अतिशय कमी किमतीच्या आणि साध्या आहेत. 
तन्वी आझमी यांनी आपल्या व्यक्तिरेखेसाठी डिझायनर साड्या नव्हे तर अतिशय साध्या साड्यांना पसंती दिली आहे. यामुळे त्यांच्या दोन्ही व्यक्तिरेखा अगदी परफेक्ट दिसतील अशी या टीमच्या मंडळींना खात्री आहे. 

Also Read : तब्बल 10 वर्षानंतर तन्वी आझमी झळकणार या मालिकेत

Web Title: Tanvi Azmi Vani Rani will be seen in this series in the Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.