इंजेक्शनशिवाय घटवलं ७५ किलो वजन, आता आणखी बारीक होण्यासाठी ड्रग्ज घेतोय तन्मय भट, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:41 IST2026-02-27T12:40:37+5:302026-02-27T12:41:21+5:30
तन्मय भटने एवढ्या लवकर इतकं झपाट्याने वजन कसं काय कमी केलं? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. तन्मयने औषधं घेऊन वजन कमी केल्याचं बोललं जात होतं. या आरोपांना आता तन्मय भटने स्वत:च उत्तर दिलं आहे.

इंजेक्शनशिवाय घटवलं ७५ किलो वजन, आता आणखी बारीक होण्यासाठी ड्रग्ज घेतोय तन्मय भट, म्हणाला...
तन्मय भट हा लोकप्रिय कॉमेडियन आहे. तन्मय गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तन्मय भटने तब्बल ११० किलो वजन कमी केलं आहे. त्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पण, तन्मय भटने एवढ्या लवकर इतकं झपाट्याने वजन कसं काय कमी केलं? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. तन्मयने औषधं घेऊन वजन कमी केल्याचं बोललं जात होतं. या आरोपांना आता तन्मय भटने स्वत:च उत्तर दिलं आहे.
तन्मय भटने त्याच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने वजन कमी करण्याच्या एका औषधी ड्रग्जचा उल्लेख केला आहे. वजन कमी करण्यासाठी GLP-1 हे ड्रग्ज घेतल्याची कबुली तन्मय भटने दिली आहे. ट्वीटमध्ये त्याने म्हटलं आहे की "GLP-1 औषधं वापरत असताना भूक अजिबात कमी न होण्याचा अनुभव कोणाला आलाय का? माझी तर भूक अजिबात कमी झालेली नाही. पुढे समजलं की माझ्यात BDNF नावाचा एक व्हेरिएंट असल्याचं दिसलं. जो तुमची पोट भरण्याची जाणीव देण्याचे सिग्नल कमकुवत करू शकतो".
Anybody here who’s fuckin around with GLP1’s experienced zero appetite suppression? I have experienced zero appetite suppression - upon further investigation, my gene report suggested a BDNF gene variant that is prone to weakened satiety signalling. Anybody here an expert on this…
— Tanmay Bhat (@thetanmay) February 25, 2026
तन्मय भटने पुढे हेदेखील स्पष्ट केलं आहे की त्याने ७५ किलो वजन हे कोणतंही इंजेक्शन न घेता कमी केलं आहे. पण नवी हेल्थ टेक्नोलॉजी वापरून बघायची इच्छा असल्याने त्याने हा पर्याय निवडला. वजन कमी करण्यासाठी ड्रग्ज न घेण्याचा कमेंटमध्ये सल्ला देणाऱ्यांना तन्मयने उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, "अरे, रिलॅक्स यार, मी एकाही GLP-1 इंजेक्शनशिवाय 75 किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं आहे. पण मला नवं हेल्थ टेक आवडतं आणि मी कसं वाटतंय हे पाहण्यासाठी मी GLP-1 वापरून पाहतोय. मी वर्कआउट करतो, चांगले पदार्थ खातो आणि गेल्या पाच वर्षांपासून नियमित ब्लड टेस्ट करतोय. मला योग्य मार्गदर्शन मिळतंय, मी काय करतोय, हे मला माहीत आहे. प्लीज मला नैतिक भाषण नका देऊ".