सुपरहिट अभिनेत्रीची सुपरफ्लॉप बहीण, तब्बल ७ वर्षांनंतर करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 09:58 IST2023-10-20T09:57:33+5:302023-10-20T09:58:21+5:30

ती तब्बल ७ वर्षांनंतर पुन्हा टेलिव्हिजनवर येत आहे.

tanisha mukherjee sister of kajol making comeback on small screen in jhalak dikhla ja show | सुपरहिट अभिनेत्रीची सुपरफ्लॉप बहीण, तब्बल ७ वर्षांनंतर करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

सुपरहिट अभिनेत्रीची सुपरफ्लॉप बहीण, तब्बल ७ वर्षांनंतर करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजोल (Kajol). 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कभी खुशी कभी गम','कुछ कुछ होता है' असे एकापेक्षा एक हिट सिनेमांमध्ये काजोलने काम केलंय. आजही काजोलच्या नावावर चित्रपट चालतात. एकीकडे करिअरमध्ये मोठं यश मिळवलेली काजोल तर दुसरीकडे सुपरफ्लॉप ठरलेली तिची बहीण तनिषा मुखर्जी (Tanisha Mukherjee). तनिषा तब्बल ७ वर्षांनंतर पुन्हा टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे.

तनिषा मुखर्जी काजोलची बहीण म्हणूनच ओळखली जाते. 2003 साली तनिषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तिचं फिल्मी करिअर खास बनलं नाही. फ्लॉप सिनेमांमुळे तिने अभिनयाला रामराम केला. नंतर ती बिग बॉस सिझन 7 मध्येही दिसली. तिथे तिचं अरमान कोहलीसोबतचं अफेअर खूपच चर्चेत आलं होतं. घरातून बाहेर आल्यानंतर काही दिवसात दोघांचं ब्रेकअप झालं. यानंतर तनिषा पुन्हा लाईमलाईटपासून दूर झाली. आता ती तब्बल ७ वर्षांनंतर पुन्हा टेलिव्हिजनवर येत आहे.

'झलक दिखला जा' या डान्स रिएलिटी शोमध्ये तनिषाचीही एन्ट्री झाली आहे. नुकताच शोचा प्रोमो रिलीज झाला. यावेळी शोमध्ये शोएब इब्राहिम, उर्वशी ढोलकिया, शिव ठाकरे, आमिर अली यांचा समावेश आहे. तर आता तनिषा मुखर्जीचंही नाव यात जोडलं गेलं आहे. तनिषाच्या कमबॅकमुळे तिचे चाहते खूश झाले आहेत.

'झलक दिखला जा' या शोमध्ये मलायका अरोरा, फराह खान आणि अर्शद वारसी जज च्या खुर्चीवर बसणार आहेत. या शोमुळे पुन्हा एकदा चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे.

Web Title: tanisha mukherjee sister of kajol making comeback on small screen in jhalak dikhla ja show