TMKOC : जेनिफरने निर्मात्यांवर केले लैंगिक शोषणाचे आरोप, भिडे मास्तर म्हणाले, "पुरुष मक्तेदारी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 08:37 IST2023-05-12T08:35:41+5:302023-05-12T08:37:53+5:30

असित मोदी जेनिफरसोबत फ्लर्ट करायचे तिला दारु पिण्यासाठी बोलवायचे असे आरोप जेनिफरने केले आहेत.

taarak mehta ka ulta chashma actress jennifer made sexual allegations on makers | TMKOC : जेनिफरने निर्मात्यांवर केले लैंगिक शोषणाचे आरोप, भिडे मास्तर म्हणाले, "पुरुष मक्तेदारी..."

TMKOC : जेनिफरने निर्मात्यांवर केले लैंगिक शोषणाचे आरोप, भिडे मास्तर म्हणाले, "पुरुष मक्तेदारी..."

Tarak Mehta Ka Ooltah Chashma : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही शो मध्ये सध्या कलाकार विरुद्ध निर्माते असा प्रकार सुरु आहे. आधी अभिनेता शैलेश लोढा यांनी निर्माते असित मोदींवर पैसे थकवल्याचे आरोप लावले. तर आता रोशन सोढीच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर (Jennifer Mistry) हिने निर्मात्यांवर थेट लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे टीव्ही विश्व हादरुन गेलं आहे. या प्रकरणी निर्माते असित मोदी यांनी आरोप फेटाळले आहेत तर मालिकेतील भिडे मास्तर म्हणजेच  अभिनेता मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) यांनी निर्मात्यांची बाजू घेतली आहे.

जेनिफरच्या आरोपांवर भिडे मास्तर हैराण

अभिनेत्री जेनिफर इतके दिवस शांत का होती आणि आता तिने हे आरोप का लावले आहेत असा प्रश्न सध्या विचारला जातोय. दरम्यान मालिकेतील भिडे मास्तरांची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर म्हणाले," मला आश्चर्य वाटतंय की त्यांनी असं का केलं? मला अजिबातच कल्पना नाही की त्या दोघांमध्ये नेमका काय वाद झाला आहे. सेटवर पुरुष मक्तेदारीसारखं काहीच नाही उलट खेळीमेळीचच वातावरण असतं. जर सेटवर चांगलं वातावरण नसतं तर शो इतकी वर्ष चाललाच नसता."

जेनिफरने काय आरोप केले?

मालिकेचे निर्माते असित मोदी जेनिफरसोबत फ्लर्ट करायचे तिला दारु पिण्यासाठी बोलवायचे असे आरोप जेनिफरने केले आहेत. ती म्हणाली,"एक दिवस निर्माते म्हणाले तुझी रुम पार्टनर नाहीए माझ्या रुममध्ये ये दारु पिऊ. मालिकेची टीम सिंगापूरला गेली होती तिथेही त्यांनी मला रुममध्ये व्हिस्की पिण्यासाठी बोलावले. मी हे बघून शॉक झाले होते. त्यांनी कित्येकदा माझ्यावर कमेंट केली आहे. सुंदर दिसत आहेस असं वाटतं पकडून तुला किस करावं अशा गलिच्छ कमेंट केल्या आहेत."

Web Title: taarak mehta ka ulta chashma actress jennifer made sexual allegations on makers