तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सोनालिका जोशीचा हा लूक पाहून व्हाल खल्लास, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 19:44 IST2019-08-12T19:42:47+5:302019-08-12T19:44:20+5:30

सोनालिकाने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटमधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Mrs Bhide aka Sonalika Joshi STUNS in new sizzling photoshoot | तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सोनालिका जोशीचा हा लूक पाहून व्हाल खल्लास, पाहा फोटो

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सोनालिका जोशीचा हा लूक पाहून व्हाल खल्लास, पाहा फोटो

ठळक मुद्देसोनालिकाच्या या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचे कपडे घातले असन खूप सारे दागिने परिधान केले आहेत. तिने लावलेली लाल टिकली सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे आणि त्यांची पत्नी माधवी भिडे यांची जोडी तर प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांचे मराठी बोलणे तर प्रेक्षकांना खूप भावते. या मालिकेत मंदार चांदवलकर आत्माराम भिडेची तर सोनालिका जोशी माधवी भिडेची भूमिका साकारत आहे. सोनालिकाने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेआधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता याच मालिकेमुळे मिळाली. प्रेक्षक आता तिला माधवी याच नावाने ओळखायला लागले आहेत. 

सोनालिकाने नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटमधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये सगळ्यांशी प्रेमळ वागणाऱ्या माधवीचा म्हणजेच सोनालिकाचा खलनायक लूक आपल्याला या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून ते या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत आहेत. 

सोनालिकाच्या या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचे कपडे घातले असन खूप सारे दागिने परिधान केले आहेत. तिने लावलेली लाल टिकली सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोतील तिच्या अदांची देखील चर्चा रंगली असून सोनालिकाचे हे वेगळे रूप तिच्या फॅन्सना भावत आहे.

 

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Mrs Bhide aka Sonalika Joshi STUNS in new sizzling photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.