'तारक मेहता'मधून गोली पडला बाहेर?, या वृत्तावर कुश शाहने सोडलं मौन; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:39 IST2024-06-21T15:38:03+5:302024-06-21T15:39:10+5:30
अभिनेता कुश शाह (Kush Shah) लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehta Ka Ulta Chashma) मधील गोलीच्या भूमिकेतून घराघरात पोहचला.

'तारक मेहता'मधून गोली पडला बाहेर?, या वृत्तावर कुश शाहने सोडलं मौन; म्हणाला...
छोट्या पडद्यावरील अभिनेता कुश शाह (Kush Shah) लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'(Tarak Mehta Ka Ulta Chashma) मधील गोलीच्या भूमिकेतून घराघरात पोहचला. या मालिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की, कुश शाहने तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडली आहे. दरम्यान आता या वृत्तावर अभिनेत्याने मौन सोडले आहे.
न्यूज १८सोबत झालेल्या बातचीतमध्ये कुश शाहला विचारण्यात आले की, आता तो तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत गोलीच्या भूमिकेत दिसणार नाही का? कुशने हे वृत्त फेटाळून लावले आहे. त्याने याबद्दल पुढे कमेंट करण्यासही नकार दिला.
कुश शाहच्या चाहत्याचा दावा निघाला खोटा
वास्तविक, कुश शाह 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो सोडत असल्याच्या अफवा तेव्हा चर्चेत आल्या जेव्हा एका चाहत्याने अभिनेत्यासोबतचा स्वतःचा फोटो फेसबुकवर शेअर केला. त्याने सांगितले की नुकतीच तो न्यूयॉर्कमध्ये कुश शाहला भेटला होता. चाहत्याने दावा केला की कुशने त्याला सांगितले की त्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो सोडला आहे आणि न्यूयॉर्कमध्ये पुढील शिक्षण सुरू आहे.
चाहत्याने फेसबुकवरून हटवली पोस्ट
या पोस्टच्या आधारे बातमी प्रसिद्ध होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, नंतर युजरने त्याच्या फेसबुक हँडलवरून पोस्ट हटवली. कुश शाह सुरुवातीपासून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या शोचा भाग आहे. तो मिस्टर आणि मिसेस हाथीचा मुलगा गोली उर्फ गुलाब कुमार हाथी या भूमिकेत दिसत आहे.
या स्टार्सनी मालिकेला केला अलविदा
'तारक मेहता का उल्टा चश्मा' गेल्या १५ वर्षांपासून छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. दिशा वकानी, भव्य गांधी, गुरुचरण सिंह, शैलेश लोढा, नेहा मेहता आणि जेनिफर मिस्त्री यांचा समावेश असलेल्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी या मालिकेला अलविदा केले आहे. अलीकडेच टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनडकटनेही मालिका सोडली आहे.