TMKOC: गोकुलधाम सोसायटीत नवीन कुटुंबाची एन्ट्री, काय आहे यांचं वैशिष्ट्य? बघा झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:22 IST2025-08-19T15:21:52+5:302025-08-19T15:22:54+5:30
मालिकेत आलेलं हे नवीन कुटुंब कोण? यांची भाषा कोणती? वाचा सविस्तर

TMKOC: गोकुलधाम सोसायटीत नवीन कुटुंबाची एन्ट्री, काय आहे यांचं वैशिष्ट्य? बघा झलक
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. यातले एकापेक्षा एक कॅरेक्टर गाजले. जेठालाल, दयाबेन, बाबुजी, टप्पू हे कुटुंब असो किंवा हाथी भाईचं असो किंवा भिडे कुटुंब असो. प्रत्येकाचीच वेगळी तऱ्हा, वेगळं वैशिष्ट्य. इतकी वर्ष आपण या कुटुंबांना बघत आलोय, हसत आलोय. पण आता गोकुळधाम सोसायटीत एका नव्या कुटुंबाची भर होत आहे. होय, १७ वर्षांनंतर सोसायटीत नवीन कुटुंब नांदायला येत आहे अशी बातमी स्वत:निर्माते असित मोदी यांनी दिली आहे.
असित मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा येत्या नवीन एपिसोडचा प्रोमो आहे. यामध्ये ते एका नवीन कुटुंबाची ओळख करुन देत आहेत. चार सदस्यांचं हे कुटुंब आहे. पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं. कुटुंबातील सर्वात छोटी सदस्य त्यांची मुलगी बंसरी. ती एक चुलबुली, समजूतदार आणि खोडकर आहे. आपल्या निरागसतेने सर्वांचं मन जिंकणारी आहे. मग येतो बंसरीचा मोठा भाऊ वीर जो खूपच क्यूट दिसतोय. मग येतात त्यांचे वडील रत्न सिंह चतुर सिंह बिंजोला. ते व्यापारी आहेत आणि त्यांचं साड्यांचं दुकान आहे. त्यांच्याकडे प्रत्येक प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन मिळतं. तसंच त्यांची पत्नी रुपवती सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिला सेल्फी क्वीनच्या रुपात दाखवलं आहे. ती दर दिवशी नवीन ट्रेंड्स फॉलो करण्यात बिझी असते. असित मोदी या कुटुंबासोबत सेल्फी काढतात आणि त्यांनाही असंच प्रेम द्या असं प्रेक्षकांना आवाहन करतात.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सुरुवातीपासूनच मुख्य ६ कुटुंब दाखवले आहेत. तारक मेहता-अंजली, जेठालाल-दयाभाभी, सोढी कुटुंब, हाथी कुटुंब, भिडे कुटुंब, अय्यर कुटुंब. प्रत्येकाची भाषा वेगळी, त्यांची संस्कृती वेगळी आहे. आता हे नवीन कुटुंब राजस्थानी आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'आसाम, उत्तराखंड किंवा केरळचं कोणीतरी आणायला हवं होतं','मारवाडी कमी आणि गुजरातीच जास्त वाटत आहेत','शो चा शेवट जवळ येतोय बंद करा आता' अशा कमेंट्स आल्या आहेत.