ओळखलंत का या मुलाला?, 'तारक मेहता'मध्ये अनेक वर्षे करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 17:39 IST2023-12-12T17:33:24+5:302023-12-12T17:39:54+5:30
शाळेच्या गणवेशात पासपोर्ट साईज फोटोमध्ये दिसणार हा क्युट मुलगा आता बराच मोठा झालाय.

ओळखलंत का या मुलाला?, 'तारक मेहता'मध्ये अनेक वर्षे करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन
गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) सध्या काही ना काही कारणाने अडचणीत सापडली आहे. आधी कलाकार सोडून गेले, काही कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. या ना त्या कारणामुळे गेल्या काही महिन्यांपासून हा शो सतत चर्चेत राहिला. आता या मालिकेतील एका कलाकाराचा बालपणीचा फोटो व्हायरल होतोय.
तुम्ही ओळखलंत का याला?
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक क्युट लहान मुलगा दिसत आहे. हा पासपोर्ट आकाराचा फोटो आहे, ज्यामध्ये एक मुलगा शाळेचा गणवेशत दिसत आहे. हा निरागस दिसणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये गोलीची भूमिका साकारणारा कुश (Kush)आहे. कुश लहानपणी खूप क्युट आणि निरागस दिसत होता. आता त्याच्या बालपणीचा हा फोटो व्हायरल होत आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील गोली अर्थात कुशने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. कुशने अनेक वर्षांपूर्वी स्वतःचा हा फोटो शेअर केला आहे. कुश शाह 'डॉक्टर हाथी' यांचा मुलगा गोलीची भूमिका साकारत आहे.