Disha Vakani : हे मां माताजी! अशी कशी झाली दयाबेनची अवस्था; रडत रडत मांडली व्यथा; 'तो' Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 16:51 IST2023-01-12T16:38:01+5:302023-01-12T16:51:37+5:30
Disha Vakani : दिशाचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना दिशासोबत नेमकं काय झालं याची काळजी वाटू लागली आहे. या व्हिडीओ मागचं नेमकं सत्य जाणून घेऊया...

Disha Vakani : हे मां माताजी! अशी कशी झाली दयाबेनची अवस्था; रडत रडत मांडली व्यथा; 'तो' Video व्हायरल
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. यातील दयाबेन हे कॅरेक्टर लोकांच्या अत्यंत आवडीचं आहे. ही भूमिका निभावणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. दिशाच्या पुनरागमनाच्या बातम्या अनेकदा शोमध्ये आल्या, पण त्यात तथ्य नव्हतं. याच दरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिशा तिची व्यथा मांडताना दिसत आहे.
दिशाचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना दिशासोबत नेमकं काय झालं याची काळजी वाटू लागली आहे. या व्हिडीओमागचं नेमकं सत्य जाणून घेऊया... सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिशा वकानी एका बाळाला हातात धरून बसलेली दिसत आहे. यासोबतच ती तिची दु:खद कहाणी सांगत आहे, ज्यामध्ये तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. ती रडत आहे आणि व्यवस्थेला दोष देत आहे. दिशाच्या या व्हिडिओवर युजर्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सध्या जोरदार व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका चित्रपटातील आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'सी कंपनी' हा चित्रपट होता. या चित्रपटात तुषार कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तुषार कपूर एका पत्रकाराच्या भूमिकेत असून दिशा वकानीची गोष्ट जगासमोर मांडत आहे. एका युजरने लिहिले की, 'आता समजलं की दया भाभी इतक्या गप्प कशा राहिल्या' तर दुसऱ्याने लिहिले, 'तारक मेहताकडे परत या'
दिशा वकानी 'तारक मेहता' शोमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. दयाबेनने शोमध्ये परतावे अशी चाहत्यांची खूप इच्छा आहे. पण ती खरंच शोमध्ये परतणार आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्रीने चार्टर्ड अकाउंटंट मयूरसोबत लग्न केले आहे. तर दिशा दोन मुलांची आई असून ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. दिशाच्या मुलीचा 2017 मध्ये जन्म झाला, तर 2022 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"