TMKOC : आता कशी दिसते दयाबेन? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिशा वकानीचा नवा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:30 IST2023-02-21T17:28:37+5:302023-02-21T17:30:44+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. यापैकीच एक म्हणजे दयाबेन. अर्थात दिशा वकानी...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben Aka Disha Vakani Mahashivratri Pooja Video | TMKOC : आता कशी दिसते दयाबेन? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिशा वकानीचा नवा Video व्हायरल

TMKOC : आता कशी दिसते दयाबेन? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिशा वकानीचा नवा Video व्हायरल

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. यापैकीच एक म्हणजे दयाबेन. अर्थात दिशा वकानी ( Disha Vakani). दिशा सध्या शोमध्ये नाही. पण ती शोमध्ये परतेल, ही आस अद्यापही कायम आहे. सध्या दिशाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय आणि तो पाहून चाहते दिशाचे चाहते क्रेझी झाले आहेत.  दिशा वकानीच्या एका चाहत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दिशाचा हा व्हिडीओ महाशिवरात्रीचा आहे.  व्हिडीओत दिशा, दिशाचा पती मयूर, तिची मुलगी शिवलिंगाची पूजा करतांना दिसतेय. दिशा तिच्या लेकाला मांडीवर घेऊन बसली आहे. दिशाचं संपूर्ण कुटुंबांचा एकत्र असा हा पहिलाच व्हिडीओ आहे.  

दिशाचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी हे भावूक झाले आहेत.  हा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांनी तिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये परतण्याची विनंती केली आहे.  काहींनी तिच्या मुलाचे नाव काय, असा प्रश्न विचारला आहे.

दिशा वकानीने ड्रॅमेटिक आर्ट्समधून शिक्षण घेतलं आहे. 2015 साली तिने मयूर पहाडीसोबत लग्न केलं. 2017 मध्ये नोव्हेंबरमध्ये तिला मुलगी झाली. त्यानंतर तिने मालिकेत काम करणं बंद केलं. दिशा वकानीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. ती देवदास, मंगल पांडे: द राइजिंग, जोधा अकबर, लव स्टोरी 2050 या सिनेमांमध्ये दिसली आहे. दयाबेन अर्थात दिशाला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसाठी दीड लाख रुपए मिळत होते. ज्यामुळे ती 2017 मध्ये दर महिन्याला 20 लाख रुपये कमाई करत होती. तिच्याकडे 37 कोटी रूपयांची एकूण संपत्ती असल्याचं सांगितलं जातं. त्यासोबतच तिच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारही आहे. मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये वाढत्या आपल्या लोकप्रियतेमुळे दयाबेनला अनेक जाहिराती मिळाल्या आणि अनेक ब्रॅन्डसोबतही तिने काम केलं.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben Aka Disha Vakani Mahashivratri Pooja Video