Taarak Mehta Ka Ooltah Chashma: घरी सुरु झाली लग्नाची तयारी, जेठालाल' बनणार सासरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 14:41 IST2021-12-04T14:22:55+5:302021-12-04T14:41:29+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतले जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी सगळ्यात लोकप्रिय आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashma: घरी सुरु झाली लग्नाची तयारी, जेठालाल' बनणार सासरे
छोट्या पडद्यावरील रसिकांची आवडती मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका आणि मालिकेतल्या व्यक्तीरेखा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातील प्रत्येक पात्र विशेष आहे, मात्र रसिकांची आवडती जोडी ठरली ती जेठालाल आणि दया.मात्र गेल्या काही वर्षांपासून दया मालिकेतून गायबच आहे. याच मालिकेने प्रत्येक कलाकराला पैसा, प्रसिद्धी, आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतले जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी सगळ्यात लोकप्रिय आहेत. दिलीप जोशी आज जेठालाल याच नावाने जास्त प्रसिद्ध आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सगळ्यांचे जेठालाल लाडके आहेत. ऑनस्क्रीन जशी त्यांची ड्रेसिंग स्टाईल आहे अगदी तशीच स्टाईल चाहके ख-या आयुष्यातही फॉलो करताना दिसतात.
चाहत्यांना जेठालालचा ऑनस्क्रीन अंदाज प्रचंड पसंतीस पात्र ठरतो. मालिकेतून घराघरात पोहचलेले जेठालाल विषयी जाणून घेण्यात चाहत्यांनाही प्रचंड रस असतो. आता लवकर जेठालालच्या घरी बँड बाजा बारातचे सूर ऐकायला मिळणार आहे. होय, जेठालालच्या घरी सध्या लग्नाची तयारी सुरुय. जेठालाल आता सासरे बनणार आहेत. जेठालालच्या मुलीचे लग्न होणार आहे. मुलीच्या लग्नात कोणत्याच गोष्टीची कमी पडू नये त्यामुळे सध्या ते लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.
११ डिसेंबरला त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडणार आहे.जेठालालचा होणारा जावई हा एनआरआए आहे.विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेचा हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. कारण हा विवाहसोहळा मुंबईतल्या आलिशान ताज हॉटेलमध्ये होणार आहे.या शाही लग्नसोहळ्यात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतले कलाकारांची खास उपस्थिती तर असणारच आहे. शिवाय मालिका विश्वातले काही खास मित्रमंडळीदेखील या लग्नाला हजेरी लावणार आहेत. जेठालालच्या मुलीच्या लग्नात मात्र दया बेन म्हणजेच दिशा वाकानी हजेरी लावणार नसल्याचे समजतंय.