'तारक मेहता...' फेम कलाकारांचं रियुनियन, ६ वर्षांच्या लेकीसोबत दिसली दयाबेन; चाहते खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:38 IST2023-12-18T11:37:14+5:302023-12-18T11:38:27+5:30

दयाबेन मालिकेत कधी परतणार याकडे चाहते आजही आस लावून बसले आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame actors reunion dayaben aka disha vakani seen with her daughter | 'तारक मेहता...' फेम कलाकारांचं रियुनियन, ६ वर्षांच्या लेकीसोबत दिसली दयाबेन; चाहते खूश

'तारक मेहता...' फेम कलाकारांचं रियुनियन, ६ वर्षांच्या लेकीसोबत दिसली दयाबेन; चाहते खूश

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ultah Chashma) फेम दयाबेन म्हणजेच दिशा वकानी (Disha Vakani) गेल्या काही वर्षांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर आहे. २०१७ मध्ये दिशा वकानीने मालिका सोडली. दोन मुलांच्या जन्मानंतर ती संसारातच रमली. दयाबेन मालिकेत कधी परतणार याकडे चाहते आजही आस लावून बसले आहेत. मात्र दिशाचा मालिकेत परतण्याचा विचार दिसत नाही. मालिकेत सोनूच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री पलक सिंधवानीने इन्स्टाग्रामवर एका लग्नातील फोटो शेअर केला आहे. या फोटोत तारक मेहता मधील काही कलाकार दिसत असून दिशा वकानीही दिसत आहे. 

पलक सिंधवानीने एका लग्नातील फोटो शेअर केला आहे. यामध्ये तारक मेहता मधील मिसेस हाथी म्हणजेच अंबिका, टप्पू म्हणजेच नितीश भालुनी  हे दोघे दिसत आहेत. अभिनेत्री अंबिका फौजदारही आहे. पण चाहत्यांची नजर मात्र फोटोतील दिशा वकानीवरच गेली. दिशा आपल्या लेकीसह या लग्नसोहळ्यासाठी आलेली दिसत आहे. यावेळी तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. दिशाला बघून चाहत्यांनी तारक मेहताचं रियुनियन अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

दयाबेन तारक मेहतामध्ये परत येण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. दरम्यान अनेकदा दयाबेन परत येत असल्याच्या अफवा पसरवल्याने चाहत्यांनी बॉयकॉट तारक मेहताचा ट्रेंड सुरु केला होता. निर्माते असित मोदी यांनी दयाबेन लवकरच परत येणार असं आश्वासन दिलं होतं. मात्र सध्या त्यांचं आश्वासन निष्फळ ठरताना दिसत आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पडद्यावर हा शो कितीही हसवत असला तरी पडद्यामागे कलाकार आणि निर्माते यांच्यात नाराजीनाट्य सुरु आहे. दिशा वकानीनंतर अनेक कलाकारांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप करत मालिका सोडली आहे.

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame actors reunion dayaben aka disha vakani seen with her daughter