कोणत्या हॉटेलमधील नव्हे तर हातगाडीवाल्या पावभाजीवर अमोल कोल्हेंनी कुटुंबियांसोबत मारला ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 15:53 IST2019-03-09T15:49:47+5:302019-03-09T15:53:17+5:30

अभिनय आणि राजकारण या दोन्ही गोष्टीत अमोल कोल्हे व्यग्र असल्याने त्यांना कुटुंबियांना वेळ देणे कठीण जाते. पण तरीही ते वेळात वेळ काढून आपल्या कुटुंबियांसोबत फिरायला जातात.

swarajya rakshak sambhaji fame dr amol kolhe has share family photo on Instagram | कोणत्या हॉटेलमधील नव्हे तर हातगाडीवाल्या पावभाजीवर अमोल कोल्हेंनी कुटुंबियांसोबत मारला ताव

कोणत्या हॉटेलमधील नव्हे तर हातगाडीवाल्या पावभाजीवर अमोल कोल्हेंनी कुटुंबियांसोबत मारला ताव

ठळक मुद्देया फोटोत आपल्याला अमोल कोल्हेंसोबत त्यांची पत्नी तसेच त्यांचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, चव पसंत पडली की जागेचा प्रश्न नसतो आपल्याला!

झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे संभाजीराजांच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी आपल्या अभिनयातून या भूमिकेद्वारे प्रेक्षकांमध्ये जबरदस्त छाप पाडली आहे. ऐतिहासिक भूमिकांवर आपला ठसा उमटवणाऱ्या अमोल कोल्हे यांचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. अमोल कोल्हे नेहमीच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

अमोल कोल्हे सध्या त्यांच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. त्यासोबत त्यांनी नुकताच शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. अभिनय आणि राजकारण या दोन्ही गोष्टीत अमोल कोल्हे व्यग्र असल्याने त्यांना कुटुंबियांना वेळ देणे कठीण जाते. पण तरीही ते वेळात वेळ काढून आपल्या कुटुंबियांसोबत फिरायला जातात. त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत आपल्याला अमोल कोल्हेंसोबत त्यांची पत्नी तसेच त्यांचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, चव पसंत पडली की जागेचा प्रश्न नसतो आपल्याला! संपूर्ण दिवसाच्या व्यग्र शेड्युलनंतर कुटुंबियांसोबतचा हा खास वेळ... मुंबईतील किंग सर्कल येथे रोडसाईड पावभाजी... 

अमोल कोल्हे यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर मोठ्या संख्येने त्याच्या फॅन्सनी या फोटोला लाईक केले आहे. तसेच अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. किंग सर्कल येथील पावभाजी खरंच छान असते असे देखील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना सांगितले आहे. 

'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी याआधी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. आजवर त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: swarajya rakshak sambhaji fame dr amol kolhe has share family photo on Instagram