स्वानंदी आणि समरची अनोखी प्रेमकथा 'वीण दोघातलीही तुटेना'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:26 IST2025-07-24T18:26:03+5:302025-07-24T18:26:29+5:30

Veen Doghatalihi Tutena Serial :'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोतदारची आणि सुबोध भावे समर राजवाडेची भूमिका साकारतो आहे.

Swanandi and Samar's unique love story in 'Veen Doghatalihi Tutena' | स्वानंदी आणि समरची अनोखी प्रेमकथा 'वीण दोघातलीही तुटेना'मध्ये

स्वानंदी आणि समरची अनोखी प्रेमकथा 'वीण दोघातलीही तुटेना'मध्ये

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही जोडी पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर एकत्र येत आहे. या जोडीची पहिली झलक समोर येताच अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मालिकेच्या प्रोमोला मिळालेलं भरभरून प्रेम मिळत आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghatalihi Tutena Serial) या नव्या मालिकेने पहिल्याच क्षणात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावरून प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळालं असून या शीर्षकाने एक वेगळं आकर्षण निर्माण केलं आहे.
 
'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोतदारची भूमिका साकारते आहे. जबाबदारीने आयुष्य जगणारी, प्रेम आणि लग्न या गोष्टी कायमच मागे टाकून कुटुंबासाठी झटणारी ३५ वर्षीय स्त्री. तर सुबोध भावे समर राजवाडेची भूमिका निभावतो आहे. एक यशस्वी व्यावसायिक आणि मनाने भावनिक माणूस, जो आपल्या भावंडांना आईवडिलांप्रमाणे प्रेम करतो आणि वाढवतोय. या दोन्ही पात्रांची परिस्थिती भिन्न असूनही कुटुंबासाठी निर्माण झालेलं नातं नंतर प्रेमात कसं रूपांतरित होतं, हे पाहणं हीच या मालिकेची खरी गोडी आहे.



 
पुष्पगंधा प्रोडक्शन प्रस्तुत या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत चंद्रकांत गायकवाड, तर लेखनाची जबाबदारी मधुगंधा कुलकर्णी आणि मुग्धा गोडबोले या सांभाळत आहेत. कथेत  स्वानंदी आणि समर, आपल्या जबाबदाऱ्यांत इतके गुंतले आहेत की त्यांचं वैयक्तिक आयुष्य मागे पढते. पण नियती त्यांना एका वळणावर एकत्र आणते. आपल्या भावंडांनासाठी समर-स्वानंदीच्या आयुष्यात प्रवेश करतो. जी गोष्ट तडजोड म्हणून सुरू होते, ती हळूहळू समजुतीच्या आणि जिव्हाळ्याच्या वीणीत गुंफली जाते.
'वीण दोघातली ही तुटेना' ही मालिका ११ ऑगस्टपासून दररोज संध्याकाळी ७.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Swanandi and Samar's unique love story in 'Veen Doghatalihi Tutena'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.