स्वामी ओमचा दावा, ‘ढिंचॅक पूजाला ‘सेल्फी’ गाणे मीच लिहून दिले’, वाचा स्वामी ओम अन् पूजाचे कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 16:31 IST2017-11-05T11:01:48+5:302017-11-05T16:31:48+5:30

बिग बॉसच्या गेल्या सीजनमध्ये सहभागी झालेल्या अन् सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या स्वामी ओमने एक दावा केला असून, त्यामध्ये त्याने ढिंचॅक पूजाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Swami Omcha claim, 'Dhinanchak Pujaal' I wrote the song 'Selfie', read the connection of Swami Om and Pooja! | स्वामी ओमचा दावा, ‘ढिंचॅक पूजाला ‘सेल्फी’ गाणे मीच लिहून दिले’, वाचा स्वामी ओम अन् पूजाचे कनेक्शन!

स्वामी ओमचा दावा, ‘ढिंचॅक पूजाला ‘सेल्फी’ गाणे मीच लिहून दिले’, वाचा स्वामी ओम अन् पूजाचे कनेक्शन!

ग बॉसच्या गेल्या वर्षीच्या सीजनमध्ये दोन वादग्रस्त स्पर्धक सहभागी झाले होते. या दोन्ही सदस्यांनी टीव्हीवर असा काही तमाशा केला की, प्रेक्षक दंग राहिले. होय, त्या स्पर्धकांची नावे प्रियंका जग्गा आणि स्वामी ओम असे आहे. यातील एकाला सलमान खानने तर दुसºयाला बिग बॉसने घराबाहेर काढले. घराबाहेर पडल्यानंतरही या दोघांचा तमाशा सुरूच होता. यामध्ये स्वामी ओमने तर अक्षरश: सर्वच परिसीमा ओलांडल्या होत्या. आता पुन्हा एकदा स्वामी ओम चर्चेत आला असून, त्याने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्वत:ला देव समजणाºया ओमचे म्हणणे आहे की, ‘बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री मिळविलेली ढिंचॅक पूजा माझ्यामुळेच इंटरनेटवर सेन्सेशन बनली आहे.’

‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ओमने दावा केला की, ढिंचॅक पूजा त्याची खूप मोठी भक्त आहे. एवढेच नव्हे तर त्याने हादेखील दावा केला की, पूजाचे ‘सेल्फी मैंने ले ली आज’ हे प्रसिद्ध गाणे मीच कंम्पोज केले आहे. मुलाखतीत स्वामी ओमने म्हटले की, ‘ढिंचॅक पूजा माझ्याकडे आली होती. तिला माहिती आहे की, मी खूप मोठा तांत्रिक आहे. तिला सुपरहिट व्हायचे होते म्हणूनच ती माझ्याकडे आली होती. तिचे जे ‘सेल्फी मैंने ले ली आज’ हे सुपरहिट गाणे आहे, ते मीच लिहिले आहे. तेव्हा मी गाणे लिहिण्याच्या मूडमध्ये होता. त्यावेळी ती माझ्यासोबत सेल्फी घेत होती, तेव्हा मी तिला यावरूनच गाणे लिहून दिले.’



स्वामी ओमला प्रसिद्धीझोतात राहण्याचे सर्व फंडे माहिती आहेत. त्यामुळेच त्याने पूजाबद्दल अशाप्रकारचे विधान केले असावे, अशी चर्चा आहे. गेल्यावर्षी स्वामी ओमने सलमान खानबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती. स्वामी ओमवर न्यायालयातही बरीचशी प्रकरणे सुरू असून, त्यात एक चोरीचा गुन्हा आहे. भावानेच त्याच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. बिग बॉस ११ बद्दल बोलताना स्वामी ओमने म्हटले की, मी माझ्या तीन मुलींना बिग बॉसच्या घरात पाठविले आहे. त्यात एक सपना चौधरी, दुसरी ढिंचॅक पूजा अन् तिसरी शिवानी दुर्गा आहे. 

बिग बॉसच्या घरात ढिंचॅक पूजाच्या परफॉर्मन्सविषयी सांगायचे झाल्यास ती घरात फार काही विशेष करताना दिसत नाही. घरात प्रवेश करताच तिची मैत्री घरातील रॅपर आकाश ददलानी याच्याबरोबर झाली होती. त्याचबरोबर हितेन तेजवानी, शिल्पा शिंदे, हिना खान यांच्यासोबत तिचा फारसा दोस्ताना नसल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Swami Omcha claim, 'Dhinanchak Pujaal' I wrote the song 'Selfie', read the connection of Swami Om and Pooja!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.