'स्वाभिमान' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री झाली भावूक, म्हणाली-माझ्याप्रमाणे तुम्ही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 13:40 IST2023-05-08T13:32:56+5:302023-05-08T13:40:14+5:30

टीआरपीच्या शर्यतीत अव्वल वर्चस्व गाजवलेल्या या मालिकेने ७०० भागांचा टप्पा पूर्ण केला. आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Swabhiman shodh astitvacha serial off air actress shared emotional post on social media | 'स्वाभिमान' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री झाली भावूक, म्हणाली-माझ्याप्रमाणे तुम्ही...

'स्वाभिमान' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री झाली भावूक, म्हणाली-माझ्याप्रमाणे तुम्ही...

छोट्या पडद्यावरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेवर, मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमही केलं आहे.स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित होणारी ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्वाभिमान मालिकेने वर्चस्व गाजवलं आणि अखेर ७०० भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 

स्वाभिमान मालिकेत आदिती सूर्यवंशी ही भूमिका आसावरी जोशी साकारली.  मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यामुळे भावुक झालेल्या आसावरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  त्यांनी अनेक दिवसांनी या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. मालिका संपल्यानंतर आसावरी यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आसावरी यांनी लिहिलं आहे की,''आज स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही प्रेक्षकांची लाडकी मालिका निरोप घेत आहे. मला माहिती आहे, माझ्याप्रमाणे तुम्ही सर्वजण खूपच भावुक झाले आहात. आजच या मालिकेचे 700 भाग पूर्ण होत आहेत.'या मालिकेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनोरंजन करता आलं याचा आनंद आहे. लवकरच एका नवीन मालिकेच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या सदिच्छांची गरज आहे...धन्यवाद..." अशी पोस्ट त्यांनी शेयर केली आहे. आसावरी जोशी यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी, प्रेक्षकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेत पूजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारी मुख्य भूमिकेत होते. तर आसावरी जोशी, अशोक शिंदे, सविता प्रभूणे, प्रसाद पंडित या कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिका होत्या.
 

Web Title: Swabhiman shodh astitvacha serial off air actress shared emotional post on social media