'जय कन्हैय्या लाल की' मध्ये 'डोला रे डोला' गाणे छोट्या पडद्यावर साकारणार स्वेता भट्टाचार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 13:57 IST2018-03-22T08:27:46+5:302018-03-22T13:57:46+5:30

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'जय कन्हैय्यालाल की' मध्ये सध्या डाली ऊर्फ स्वेता भट्टाचार्य आणि रॉकी यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू ...

Sveta Bhattacharya will make a short film on "Doa Re Dola" in 'Jai Kanhaiya Lal Ki' | 'जय कन्हैय्या लाल की' मध्ये 'डोला रे डोला' गाणे छोट्या पडद्यावर साकारणार स्वेता भट्टाचार्य

'जय कन्हैय्या लाल की' मध्ये 'डोला रे डोला' गाणे छोट्या पडद्यावर साकारणार स्वेता भट्टाचार्य

ट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'जय कन्हैय्यालाल की' मध्ये सध्या डाली ऊर्फ स्वेता भट्टाचार्य आणि रॉकी यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू असून लग्नाच्या विधी सुरू झाल्या असून सेलिब्रेशन जोरदार सुरू आहे. ह्या शो च्या निर्मात्यांनी शाहरूखच्या देवदास चित्रपटातील लोकप्रिय ‘डोला रे डोला’ गाणे शूट करायचे ठरवले.बॉलिवूड गाण्यांनुसार हे गाणे शूट करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे हे गाणे या दोघांवरच शूट करण्यात आले आहे. डालीच्या परिवाराला तिचा हा डान्स आवडेल आणि डालीसुद्धा तिचा परफॉर्मन्स स्वतः खूप छान एन्जॉय करेल.ह्याबद्दल स्वेता म्हणाली, “मुळात हे गाणे खूप सुपरहिट ठरले होते.आजही ते गाणे कानावर पडताच पाय आपोआप थिरकु लागतात.सगळ्यात आधी मला डान्स करायला खूप आवडतो आणि संपूर्ण वेडिंग सीक्वेन्समध्ये ह्या गाण्यावर बेधुंद थिरकले. मालिकेतील सगळ्यांत जास्त हा ट्रॅक मी खूप एन्जॉय केले.माझ्यासाठी हा ट्रॅक शूट करणे सर्वोत्तम भाग आहे.हा डान्स सिक्वेन्स शूट करताना मला माझ्या लहानपणीच्या आठणी ताज्या होत होत्या.कारण मी लहान असताना ह्यावर परफॉर्म केले होते आणि आता पुन्हा एकदा ह्या छान गाण्यावर परफॉर्म करणे त्याची मजा काही औरच होती.अर्थातच ऐश्वर्या आणि माधुरी यांची जुगलबंदी गाण्यात सा-यांनीच एन्जॉय केली आहे.दोघांचेही हावभाव,डान्सस्टेप,त्यांचा लूक सगळ्या गोष्टी वारंवार निरिक्षण केले आणि या गाण्याला पूर्ण न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे.”

मुळात 'जय कन्हैय्यालाल की' ही मालिका लोकप्रिय बंगाली टिव्ही मालिका 'भोजो गोबिंदोचा' रिमेक आहे.या मालिकेच्या माध्यमातून स्वेता भट्टाचार्यने टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केले आहे. जेव्हा निर्मात्यांनी मला मालिकेची संकल्पना सांगितली तेव्हा नाही बोलण्याचा प्रश्नच नव्हता कारण,मालिकेची कथा खूपच इंटरेस्टींग वाटले.ही संधी स्विकारली.ही मालिका जानकी नाथ चौधरी,दाली आणि कन्हैय्या या तीन व्यक्तिरेखाभोवती फिरते.एक श्रीमंत आजोबा जानकी नाथ चौधरी आणि त्यांची अतिशय लाडावलेली नात दालीची कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे.ही मालिका हलके फुलके कौटुंबिक नाट्‌यावर आधारित असून 'जय कन्हैय्या लाल की' ही मालिका रसिकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाली आहे.

Web Title: Sveta Bhattacharya will make a short film on "Doa Re Dola" in 'Jai Kanhaiya Lal Ki'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.