Valentine Day 2023: सुयश-आयुषीचा अंडरवॉटर रोमान्स, शेअर केला लिपलॉक करतानाचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:27 IST2023-02-14T13:26:41+5:302023-02-14T13:27:38+5:30
Suyash Tilak and Aayushi Bhave : आज प्रेमाचा दिवस. अर्थात व्हॅलेन्टाईन डे. जगभर व्हॅलेन्टाईन डे साजरा होतोय. सर्वत्र प्रेमाचा उधाण आलंय. आपले मराठी सेलिब्रिटीही मागे नाहीत.

Valentine Day 2023: सुयश-आयुषीचा अंडरवॉटर रोमान्स, शेअर केला लिपलॉक करतानाचा फोटो
Suyash Tilak and Aayushi Bhave: आज प्रेमाचा दिवस. अर्थात व्हॅलेन्टाईन डे. जगभर व्हॅलेन्टाईन डे साजरा होतोय. सर्वत्र प्रेमाचा उधाण आलंय. आपले मराठी सेलिब्रिटीही मागे नाहीत. व्हॅलेन्टाईन डेचं निमित्त साधत अनेक मराठी सेलिब्रिटींनी आपल्या जोडीदारासोबतचे रोमॅन्टिक फोटो, आठवणी शेअर करण्याचा धडाका लावला आहे. मराठमोळा अभिनेता सुयश टिळक याची पत्नी आयुषीने एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुयश व आयुषी दोघं अंडरवॉटर रोमान्स करताना दिसत आहेत. दोघं अंडरवॉटर लिपलॉक करत आहेत.
“उफ, ये दिल का क्या करे…व्हॅलेंटाइन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस प्रेमाचा, मिठीचा आहे”, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
एक भेट आणि वर्षभराचा दुरावा..., अशी सुरू झाली होती सुयश-आयुषीची ‘INSTA’ लव्हस्टोरी
‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुयश घराघरात पोहोचला. मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून तो ओळखला जाऊ लागला. याच सुयशच्या आयुष्यात आयुषीची एन्ट्री झाली ती 2018 साली. होय, 2018 साली ‘श्रावण क्वीन’ या स्पर्धेत आयुषी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि सुयश या कार्यक्रमात त्याच्या एका मालिकेचं प्रमोशन करायला गेला होता. या कार्यक्रमात सुयशने आयुषीला पहिल्यांदा पाहिलं. आयुषी माझ्या आयुष्यात येण्याचं कारण म्हणजे श्रावण क्वीन स्पर्धा, असं आयुष सांगतो तो त्याचमुळे.
अर्थात स्पर्धेच्या निमित्ताने भेट झाली असली तरी प्रेम काही लगेच बहरलं नाही. सुयशला आयुषी पहिल्याच नजरेत आवडली होती. पण आयुषीच्या तर सुयश इतका मोठा अभिनेता आहे हे गावीही नव्हतं. श्रावण क्वीन स्पर्धेत जुजबी ओळख झाली होती तेवढीच. कारण त्यानंतर वर्षभर दोघांचही एकमेकांशी काहीही बोलणं नव्हतं. सुयश नावाच्या व्यक्तिला आपण कधी भेटलोय, आयुषीला तर याचाही विसर पडला होता. पण म्हणतात ना, प्रेमाच्या, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधून येतात... वर्षभरानंतर पुन्हा आयुषी व सुयश भेटले आणि तेही श्रावण क्वीन स्पर्धेच्या निमित्तानेच.
होय, सुयश या कार्यक्रमाचा होस्ट होता आणि आयुषीला गतवर्षीची विजेती म्हणून या कार्यक्रमात बोलवलं गेलं होतं. तिथे चांगली ओळख झाली. मग दोघांनीही एकमेकांना इन्स्टावर फॉलो केलं. इन्स्टावर दोघांचंही बोलणं सुरू झालं. अर्थात पुढाकार सुयशनेच घेतला होता. हळहळू गप्पा सुरू झाल्या. मग मैत्री झाली आणि मग एकदिवस दोघांनी भेटायचं ठरवलं. गणपतीच्या काळात दोघांचीही पहिली भेट झाली. यानंतर दोघंही कधी एकमेकांच्या प्रेमात पडले, तेही त्यांना कळलं नाही. सुयश व आयुषीने ऑक्टोबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली.