टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, घरात अशा अवस्थेत मिळाला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 17:11 IST2021-09-11T17:11:06+5:302021-09-11T17:11:41+5:30
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह राहत्या घरात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, घरात अशा अवस्थेत मिळाला मृतदेह
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह राहत्या घरात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या अभिनेत्याने आत्महत्या केली की हत्या झाली असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. अभिनेता रमेश वलियासाला यांचा मृतदेह राहत्या घरात शनिवारी रहस्यमय परिस्थितीत आढळला. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली असून तपास सुरू आहे.
अभिनेता रमेश वलियासाला यांचा मृतदेह घरात गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला आहे. रमेश हे दोन दिवसांपूर्वी नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगवरून घरी परतले होते. ते मल्याळमधील सर्वात लोकप्रिय अभिनेते म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात देखील काम केले होते.
रमेश वलियासाला यांनी आपल्या करियरची सुरुवात महाविद्यालयातील नाटकांपासून केली होती. रंगभूमीपासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास मालिका आणि सिनेमापर्यंत पोहोचला. त्यांनी २२ वर्ष वेगवेगळ्या भूमिका साकारत घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक जाण्यामुऴे मल्याळम टेलिव्हिजन आणि सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
रमेश वलियासाला यांच्या निधनाची माहिती सर्वात आधी निर्माते आणि प्रोडक्शन कंट्रोलर एनएम बदूशा यांनी सोशल मीडियावर दिली होती. खूप समस्या असेल पण जीवनापासून दूर पळून काय फायदा? बदूशाने फेसबुकवर लिहिले की, माझा प्रिय मित्र रमेशला श्रद्धांजली.