सावधान इंडियाने १०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सुशांत सिंगने असा केला आपला आनंद साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 15:59 IST2018-11-14T15:57:40+5:302018-11-14T15:59:12+5:30
सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असून भारतीय टीव्हीवर सूत्रसंचालन करण्याबद्दल तो समाधानी आहे.

सावधान इंडियाने १०० भागांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल सुशांत सिंगने असा केला आपला आनंद साजरा
लोकांना जागरूकता आणणे आणि त्यांना सतर्क राखण्याचे उद्दिष्ट्य असलेल्या 'सावधान इंडिया'ने आता आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. ह्या शो ने नुकतेच १०० भाग पूर्ण केले असून सावधान इंडियाच्या अख्ख्या टीमसाठी ही अभिमानाची बाब आहे. ह्या शो च्या दुसऱ्या सीझनची जुलै महिन्यात सुरूवात झाली आणि प्रेक्षकांकडून ह्या शो चे मोठे कौतुक होत आहे.
सुशांत सिंग हा भारतीय टेलिव्हिजनवरील एक नावाजलेला अभिनेता असून तो सुरूवातीपासून ह्या शो चे सूत्रसंचालन करत आहे. ह्या शोसोबत तो ६ वर्षांपासून संलग्न असून ह्या नवीन यशाबाबत तो अतिशय समाधानी आहे आणि त्याला खात्री आहे की भविष्यात अशा सेलिब्रेशनच्या अनेक संधी हा शो प्रदान करेल.
सुशांत सिंग म्हणाला, “मी खूप आनंदात आहे की सावधान इंडियाने दुसऱ्या सीझनमध्ये १०० भाग पूर्ण केले आहेत. मी सावधान इंडियासोबत गेल्या ६ वर्षांपासून संलग्न असून ही माझ्यासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. मी ह्या शोमध्ये माझे तनमन लावले असून हा शो माझ्यासाठी खूप खास आहे. मी आमच्या सर्व प्रेक्षकांचे ह्या यशासाठी आभार मानतो आणि त्यांचे असेच प्रेम आणि समर्थन मिळत राहिल अशी आशा करतो.”
अभिनेता सुशांत सिंह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्याबद्दल प्रसिध्द आहे. ‘सावधान इंडिया’च्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करणा-या सुशांत सिंहने सूत्रसंचालनात आता चांगलेच प्रवीण्य मिळविले असून त्याला आता वृत्त निवेदन करायचे आहे. सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असून भारतीय टीव्हीवर सूत्रसंचालन करण्याबद्दल तो समाधानी आहे. पण सूत्रसंचालनाच्या या प्रदीर्घ अनुभवामुळे त्याला सूत्रसंचालनाबद्दल बरीच माहिती मिळाली असून आता संधी मिळाल्यास लोकप्रिय वृत्त वाहिन्यांवरील गुन्हेगारीविषयक कार्यक्रमात वृत्त निवेदनाचे काम करण्यास आपल्याला आवडेल, असे त्याने म्हटले आहे. तसेच एखाद्या वादविवाद कार्यक्रमातही आपले अनुभव सादर करण्याची त्याची इच्छा आहे. ‘सावधान इंडिया’च्या सूत्रसंचालनामुळे बातम्यांच्या संवेदनशीलतेचे महत्त्व आपल्याला जाणवले असून त्यामुळे अशा वाहिनीवर आपण एक उत्तम वृत्त निवेदक म्हणून काम करू शकतो, असे त्याला वाटते.