'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधून सुरूची अडारकरची एक्झिट, शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 18:15 IST2024-04-13T18:15:36+5:302024-04-13T18:15:57+5:30
Suruchi Adarkar : अस्तिकाचा अंत झाल्यामुळे आता 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून अभिनेत्री सुरूची अडारकरची एक्झिट झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधून सुरूची अडारकरची एक्झिट, शेअर केली पोस्ट
छोट्या पडद्यावर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका पहिल्या दिवसापासून लोकप्रिय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत अस्तिका आणि विरोचका यांची एन्ट्री झाल्यामुळे ही मालिका चांगलीच रंजक वळणावर आली होती. त्यानंतर आता अद्वैतचा जीव वाचवत असतांना नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत होणार आहे. अस्तिकाचा अंत झाल्यामुळे आता या मालिकेतून अस्तिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरूची अडारकर(Suruchi Adarkar)ची एक्झिट झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
सुरूची अडारकर हिने इंस्टाग्रामवर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील तिच्या भूमिकेतील फोटो शेअर करत लिहिले की, काही गोष्टींचा कालावधी कमी असतो पण तो निश्चितच अल्पजीवी नसतो. माझ्या 'अस्तिका' हे पात्र निरोप घेत आहे. झी मराठी आणि आयरिश प्रोडक्शनने मला इतके मनोरंजक उत्कट काल्पनिक पात्र दिल्याबद्दल धन्यवाद. मी साकारेन असे मला वाटले नव्हते..
ती पुढे म्हणाली की, 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या टीम सोबत काम करणे ही एक भेट होती.. मालिकेतील सर्व आठवणींसाठी नेहमीच कृतज्ञ राहीन. ऐश्वर्या नारकर ताई, तितिक्षा तावडे, एकता डांगर, अमृता रावराणे यांचा विशेष उल्लेख मला असा प्रेमळ निरोप दिल्याबद्दल. आयुष्यभरासाठी मला नक्कीच चांगले मित्र मिळाले आहेत. अल्प काळ पण माझ्या हृदयाचा मोठा भाग व्यापला आहे. मायबाप प्रेक्षक, तुमचे विशेष आभार इतके भरून प्रेमळबद्दल. मी कायम तुमची ऋणी राहीन. आशीर्वाद देत राहा आणि प्रेम करत रहा.