सुरुची आडारकरने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 14:45 IST2025-02-13T14:44:14+5:302025-02-13T14:45:44+5:30
सुरुची अडारकर जेवढी उत्तम अभिनेत्री आहे. तेवढीच तिची अध्यात्मिक बाजू देखील खास आहे.

सुरुची आडारकरने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन
Suruchi Adarkar: 'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरुची आडारकर (Suruchi Adarkar). टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा अशी तिची ओळख आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका तिनं साकारलेल्या आहेत. सुरुची अडारकर जेवढी उत्तम अभिनेत्री आहे. तेवढीच तिची अध्यात्मिक बाजू देखील खास आहे. ती कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसते. आताही ती उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली आहे.
नुकतेच सुरुचीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन घेतलं. ती शिवभक्तीत तल्लीन झाल्याचं दिसून आलं. "जय महाकाल.. चिंता सोडून, शांतात प्राप्तीच्या मार्गावर",असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर आहे. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हे ज्योतिर्लिंग पांडवांनी बांधले होते. दरम्यान, सुरुचीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. करिअर आणि वैयक्तिक जीवनातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत झळकली होती. तिच्या नव्या प्रोजेक्टची चाहते वाटत पाहत आहेत.