n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">कबूल है या मालिकेमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री सुरभी ज्योती लवकरच इश्कबाज या मालिकेत झळकणार आहे. तिची या मालिकेत एंट्री एका वधूच्या वेशात होणार आहे. या तिच्या वेशभूषेची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सुरभीदेखील या वेशभूषेच्या प्रेमात पडली आहे. ती सांगते, "या मालिकेत मी घातलेला लेहेंगा अतिशय सुंदर आहे. याची डिझाइन आधुनिक पद्धतीची असल्याने तो लेहेंगा आजच्या पिढीला नक्कीच आवडेल यात काही शंकाच आहे. लेहेंगा पाहाताचक्षणी मी त्याच्या प्रेमात पडले. या लेहेंगाला साजेशी अशी माझी ज्वेलरी आहे. ही ज्वेलरी खूपच नाजूक असून त्यामुळे माझ्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. माझ्या या मालिकेतील एंट्रीसाठी मी खूपच उत्सुक आहे."