​मृणालने दिले सरप्राईज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 16:43 IST2016-09-19T11:13:00+5:302016-09-19T16:43:00+5:30

कुमकुम भाग्या या मालिकेत मृणाल ठाकूर बुलबुलची व्यक्तिरेखा साकारत होती. तिने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. आज ती या ...

Surprise by the Mrinal | ​मृणालने दिले सरप्राईज

​मृणालने दिले सरप्राईज

मकुम भाग्या या मालिकेत मृणाल ठाकूर बुलबुलची व्यक्तिरेखा साकारत होती. तिने काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. आज ती या मालिकेचा भाग नसली तरी या मालिकेतील कलाकारांसोबत तिचे खूपच चांगले संबंध आहेत. तिने नुकतेच चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन मालिकेच्या टीमला सरप्राईझ दिले. याविषयी मृणाल सांगते, "या मालिकेचे चित्रीकरण माझ्या घराच्या जवळच होते. त्यामुळे मी सगळ्यांना सरप्राईज देण्याचे ठरवले. मालिकेच्या सेटवर गेल्यावर मला माझ्या चित्रीकरणाचे दिवस आठवले. मी मालिकेचा भाग नसल्याने मला सुप्रिया शुक्ला यांच्या जेवणाची खूप आठवण येते. त्या माझ्यासाठी खास जेवण घेऊन यायच्या आणि लहान मुलांप्रमाणे मला भरवायच्या. त्यामुळे हे सगळे मी मिस करतेय." 

Web Title: Surprise by the Mrinal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.