आश्चर्य ! मालिकेतील ‘हनुमान गल्ली’ खरोखर अवतरली राजस्थानच्या पुष्करमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 14:43 IST2017-02-21T09:13:22+5:302017-02-21T14:43:22+5:30

'दिया और बाती हम' मालिका ही केवळ एक टीव्ही मालिका नव्हती या मालिकेशी रसिकांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले ...

Surprise! The Hanuman Gali in the series is really in Pushkar, Rajasthan | आश्चर्य ! मालिकेतील ‘हनुमान गल्ली’ खरोखर अवतरली राजस्थानच्या पुष्करमध्ये

आश्चर्य ! मालिकेतील ‘हनुमान गल्ली’ खरोखर अवतरली राजस्थानच्या पुष्करमध्ये

'
;दिया और बाती हम' मालिका ही केवळ एक टीव्ही मालिका नव्हती या मालिकेशी रसिकांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. दिया और बाती ही मालिका रसिकांशी इतकी काय जुळली होती की, चक्क मालिकेतील  सूरज-संध्या या जोडप्याच्या ज्या परिसरात राहत असल्याचे दाखवण्यात आले होते त्या मालिकेच्या परिसरातील नवावरून चक्क पुष्कर येथील एका गल्लीचं नामकरण ‘हनुमान गल्ली’ असं करण्यात आले आहे. ऐकुण आश्यर्य वाटले असणार,मालिकेत दाखवण्यात आलेल्या गोष्टी रसिक आपल्या ख-याखु-या गोष्टीतही साम्य शोधू लागले आहेत. मालिकेत दाखवण्यात आलेली ‘हनुमान गली’ हा एक काल्पनिक पत्ता असला तरी रसिकांनी त्यांच्या शहरातील गल्लीला हेच नाव देऊन एक कल्पना सत्यात उतरवली आहे. ही मालिकेतून राजस्थानातील संस्कृतीचे दर्शन घडले होते. राजस्थानी रसिक आपसूकच या मालिकेशी जोडले गेले.  'दिया और बाती' मालिका बंद झाली असली तरी  आजही रसिकांच्या मनात घर करून आहे.मुलगी लग्न करून जेव्हा सासरी येते तेव्हा लग्नानंतरही आपला पती आणि घरच्या व्यक्तींच्या मदतीने आपली स्वप्न, आकांक्षा यांना पूर्ण करण्यासाठी लागणारा एक विश्वास अनेक तरुण त्यांच्या कुटुंबातील महिलांना देऊ लागला आहे. सूरज आणि संध्या या दोघांच्या प्रेमळ नात्यांप्रमाणेच राजस्थानमध्ये तरूण तिच्या पत्नीचा आदर करू लागला आहे.त्यामुळे दिया और बाती हम या मालिकेने रसिकांचे फक्त मनोरंजनच केले नाहीय तर आयुष्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोणही दिला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.त्यामुळे आता 20 वर्ष पुढे जात हीच मालिका ‘तू सूरज, मैं सांझ पियाजी’ नावाने लवकरच सुरू होणार आहे. या मलिकेच्या दुस-या पर्वामध्येही रसिकांसाठी अनेक सुंदर विचार जाणून घेता येतील. 

Web Title: Surprise! The Hanuman Gali in the series is really in Pushkar, Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.