Twins होणार असल्याच्या चर्चांवर अखेर सुरभी ज्योतीने सोडलं मौन, म्हणाली- "मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:29 IST2026-04-06T13:29:36+5:302026-04-06T13:29:55+5:30

सुरभीने शेअर केलेल्या सोनोग्राफीच्या फोटोंवरुन तिला ट्विन्स(जुळी मुलं) होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता सुरभीने मौन सोडत खरं काय ते सांगून टाकलं आहे.

Surbhi Jyoti clarifies the rumors of having twins shared post said im not having twins | Twins होणार असल्याच्या चर्चांवर अखेर सुरभी ज्योतीने सोडलं मौन, म्हणाली- "मला..."

Twins होणार असल्याच्या चर्चांवर अखेर सुरभी ज्योतीने सोडलं मौन, म्हणाली- "मला..."

अभिनेत्री सुरभी ज्योतीने आई होणार असल्याची गुडन्यूज काही दिवसांपूर्वी चाहत्यांना दिली होती. पण, सुरभीने शेअर केलेल्या सोनोग्राफीच्या फोटोंवरुन तिला ट्विन्स(जुळी मुलं) होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता सुरभीने मौन सोडत खरं काय ते सांगून टाकलं आहे. सुरभीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने ट्विन्स होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. 

सुरभी ज्योतीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने जुळी मुलं होणार नसल्याचं म्हटलं आहे. "नाही, मला जुळी मुलं होणार नाहीयेत", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुरभीने शेअर केलेल्या पोस्टनंतर तिला जुळी मुलं होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे चाहतेही आता तिच्या बाळाची वाट पाहत आहेत. 

सुरभीला कुबुल है, नागिन या मालिकांमुळे प्रसिद्धी मिळाली. सुरभीने पती सुमित सुरीसोबत गेल्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमध्ये खाजगी पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच या जोडप्याने आपल्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याची घोषणा केली आहे. वयाच्या ३७व्या वर्षी सुरभी ज्योती आई होणार असल्याने ती आनंदी आहे. 

Web Title : सुरभि ज्योति ने जुड़वां बच्चों की अफवाहों पर तोड़ी चुप्पी, गर्भावस्था का सच बताया

Web Summary : अभिनेत्री सुरभि ज्योति, जो अपने पहले बच्चे की उम्मीद कर रही हैं, ने जुड़वां बच्चों के होने की अफवाहों पर स्पष्टीकरण दिया। एक सोशल मीडिया पोस्ट के माध्यम से, उन्होंने पुष्टि की कि वह जुड़वां बच्चों की उम्मीद नहीं कर रही हैं, जिससे अटकलों पर विराम लग गया। सुरभि ने पिछले अक्टूबर में सुमित सूरी से शादी की और हाल ही में अपनी गर्भावस्था की घोषणा की।

Web Title : Surbhi Jyoti Addresses Twins Rumors, Reveals the Truth About Pregnancy

Web Summary : Actress Surbhi Jyoti, expecting her first child, clarified rumors of having twins. Through a social media post, she confirmed she is not expecting twins, putting speculation to rest. Surbhi married Sumit Suri last October and announced her pregnancy recently.