'जय मल्हार'मधील म्हाळसा फेम सुरभी हांडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 13:47 IST2024-12-07T13:46:51+5:302024-12-07T13:47:42+5:30

Surbhi Hande : म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात सुरभी हांडेने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.

Surbhi Hande of Mhalsa fame from 'Jai Malhar' will be seen on the small screen in this series. | 'जय मल्हार'मधील म्हाळसा फेम सुरभी हांडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत

'जय मल्हार'मधील म्हाळसा फेम सुरभी हांडेचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत

महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' (Aai Tulajabhawani Serial) या मालिकेत आतापर्यंत देवीचे अनेक अवतार पाहायला मिळाले आहेत. देवीच्या विविध अवतारांचा हा आध्यात्मिक प्रवास प्रेक्षकांसाठी निश्वितच वेगळा ठरत आहे. अशातच आता म्हाळसा देवीच्या भूमिकेद्वारे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुरभी हांडे(Surabhi Hande)ची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. 'आई तुळजाभवानी' मालिकेत सुरभी म्हाळसाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांना दररोज रात्री ९ वाजता 'कलर्स मराठी'वर पाहता येईल. या भागामध्ये म्हाळसा देवी आई तुळजा भवानीचे नव्या प्रवासात अनोख्या पद्धतीने स्वागत करताना दिसणार आहे. तुळजा आणि म्हाळसा मिळून दुर्जनानांचा संहार कसा करतील हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 

म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात सुरभी हांडेने आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आता 'आई तुळजाभवानी' या मालिकेच्या माध्यमातून सुरभी प्रेक्षकांवर छाप पाडायला सज्ज आहे. चेहऱ्यावर भक्तीमय तेज, आकर्षक दागिने, पारंपारिक साडी, प्रभावशाली असं दैवी व्यक्तिमत्त्व म्हाळसाच्या रुपात पाहायला प्रेक्षक  उत्सुक आहेत. 'आई तुळजाभवानी' मालिकेच्या कथानकाने वेग पकडला असून असुरांपासून भक्तांचे रक्षण करण्यासाठी म्हाळसा तुळजाला पाठिंबा देताना दिसून येईल. 


सुरभी हांडे म्हणाली, १० वर्षाने म्हाळसा आता परत सर्वांसमोर येतेय याचा आनंद आहे. म्हाळसाला बघायला प्रेक्षकांना जसं आवडतं तसंच ते पात्र साकारायला मला आवडतं. हे पात्र माझ्यासाठी नेहमीच खास होतं. आता 'आई तुळजाभवानी' या पात्राच्या माध्यमातून मला म्हाळसाला न्याय देण्याची एक चांगली संधी मिळाली आहे".

सुरभीने मानले आभार

सुरभी पुढे म्हणाली,'आई तुळजाभवानी'सह म्हाळसा जेव्हा असूरांसोबत युद्ध करते असा सीन शूट करताना मला वाटत होतं की, दोन स्त्रीशक्ती कोणासोबत तरी लढत आहेत. पूजासोबत काम करताना खूप छान वाटलं..तिचंही कौतुक वाटलं. 'आई तुळजाभवानी' मालिकेत म्हाळसा हे पात्र साकारण्याची संधी दिल्याबद्दल 'कलर्स मराठी' आणि बहुरुपी प्रोडक्शनचे आभार. 
 

Web Title: Surbhi Hande of Mhalsa fame from 'Jai Malhar' will be seen on the small screen in this series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.