लग्नानंतर सूरजचा पत्नी संजनासोबत गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:15 IST2025-12-01T18:12:35+5:302025-12-01T18:15:11+5:30

लग्नानंतर सूरज आणि संजना यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिलेल्या नवीन घरात गृहप्रवेश केला.

Suraj Chavan Wedding Sanjana Gofane Grihapravesha see video | लग्नानंतर सूरजचा पत्नी संजनासोबत गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

लग्नानंतर सूरजचा पत्नी संजनासोबत गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

Suraj Chavan Wedding: 'बिग बॉस' मराठी सिझन ५ चा विजेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला. सूरजने मैत्रीण संजना गोफणेशी लग्नगाठ बांधली.  पुण्यातील सासवड येथे त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. सूरजच्या लग्नाचे बरेच फोटो, व्हिडीओ व्हायरल झालेत. लग्नानंतर सूरज आणि संजना यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिलेल्या नवीन घरात गृहप्रवेश केला.

सूरज आणि संजनानं पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश केला. संजनाने सून म्हणून पहिल्यांदा घरात पाऊल ठेवतानाचे शुभ क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. संजनाने तांदळानं भरलेल्या कलशाला हलके ढकलून घरात प्रवेश केला. तिच्यानंतर सुरजही घरात आला. या व्हिडीओमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतोय. या सुंदर व्हिडीओवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन 

दरम्यान, सूरज आणि संजना यांनी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलं.  परंपरेनुसार नवऱ्याने नवरीला उचलून पायऱ्या चढण्याची प्रथा आजही जेजुरीत पाळली जाते. ही प्रथा पाळत सूरजही संजनाला उचलून पायऱ्या चढला. सूरजची पत्नी संजना गोफणे ही त्याच्या चुलत मामाची मुलगी आहे. सूरज व संजनाचे हे लव्ह मॅरेज आहे, कारण ते लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. अखेर आता दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. 

Web Title : सूरज और संजना का शादी के बाद गृहप्रवेश, वीडियो वायरल।

Web Summary : बिग बॉस मराठी 5 के विजेता सूरज चव्हाण ने संजना गोफणे से सासवड में शादी की। शादी के बाद, दंपति ने अजित पवार द्वारा बनाए गए अपने नए घर में पारंपरिक गृहप्रवेश समारोह किया। उन्होंने जेजुरी मंदिर भी गए।

Web Title : Suraj and Sanjana's post-wedding housewarming goes viral.

Web Summary : Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan married Sanjana Gophane in Saswad. Following the wedding, the couple performed a traditional housewarming ceremony at their new home, built by Ajit Pawar. They also visited Jejuri temple.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.