लव्ह मॅरेज यशस्वी! सूरज चव्हाणची लग्नानंतर पहिलीच पोस्ट, बायकोसोबत घेतलं खंडेरायाचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:30 IST2025-12-01T16:29:26+5:302025-12-01T16:30:30+5:30
सूरज आणि संजना यांचे जुने रील्सही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लव्ह मॅरेज यशस्वी! सूरज चव्हाणची लग्नानंतर पहिलीच पोस्ट, बायकोसोबत घेतलं खंडेरायाचं दर्शन
बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण कालच लग्नबंधनात अडकला. सूरजने मैत्रीण संजना गोफणेशी लग्नगाठ बांधली. पुण्यातील सासवड येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. सूरजच्या चाहत्यांची संख्या पाहता अनेक लोकांनी लग्नाला गर्दी केली. सूरजच्या लग्नाचे बरेच फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले. तर आता सूरजने लग्नानंतर पहिली पोस्ट शेअर केली आहे. 'लव्हमॅरेज यशस्वी' असं त्याने म्हटलं आहे.
सूरज चव्हाण टिक टॉकमुळे प्रसिद्ध झाला. त्याचे अनके फॉलोअर्स तयार झाले. नंतर त्याला बिग बॉसमध्ये मराठी मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आपल्या साधेपणाने त्याने मन जिंकलं. इतकंच नाही तर थेट ट्रॉफीही पटकावली. सूरजने अनेकदा लग्नाची इच्छा बोलून दाखवली होती. अखेर काल त्याची ती इच्छा पूर्ण झाली. सूरजची बायको संजनाही याआधी त्याच्यासोबत रील्स करायची. आपल्या जुन्या मैत्रिणीशीच सूरजने लग्न केलं. आता बायकोसोबतचे फोटो शेअर करत त्याने लिहिले,'जी होती मनात तीच बायको केली, Love Marriage Successfull'
सूरजच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सूरज आणि संजना खूप आधीपासून मित्र आहेत. आता त्या दोघांचे जुने रील्सही व्हायरल होत आहे. त्यात संजना दिसत असून तीच आता त्याची बायको झाली आहे. लग्नानंतर सूरज बायकोसोबत जेजुरी येथे खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. बायकोला खांद्यावर उचलून तो जेजुरी गड चढला. याचेही फोटो, व्हिडीओ त्याने पोस्ट केले आहेत. 'काय सांगू खंडेराया या दिवसांसाठी मी किती वाट पाहिली, अशीच राहू दे तुझ्या कृपेची अविरत सावली' असं कॅप्शन त्याने दिलं आहे.
सूरज हा प्रसिद्ध रीलस्टार आहे. बिग बॉस मराठी ५ मुळे त्याच्या चाहत्या वर्गात भर पडली. त्यानंतर सूरज झापुक झुपूक या सिनेमातही दिसला होता. त्याच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, योगिता चव्हाण आणि पुरुषोत्तम पाटील यांनी हजेरी लावली होती.