'सूर राहू दे' मालिकेत संग्राम साळवी दिसणार वेगळ्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 06:00 IST2018-10-03T12:50:14+5:302018-10-04T06:00:00+5:30

 झी युवावर नुकतीचं 'सूर राहू दे' ही नवी मालिका रसिकांच्या भेटली आली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही जोडी नव्याने प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे

'Sur Rahu De' will be seen in the series 'Sangram Salvi' in different look | 'सूर राहू दे' मालिकेत संग्राम साळवी दिसणार वेगळ्या अंदाजात

'सूर राहू दे' मालिकेत संग्राम साळवी दिसणार वेगळ्या अंदाजात

ठळक मुद्देखऱ्या आयुष्यात संग्राम त्याच्या तन्मय या व्यक्तिरेखेपेक्षा खूप वेगळा आहे एक वेगळा संग्राम ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे

 झी युवावर नुकतीचं 'सूर राहू दे' ही नवी मालिका रसिकांच्या भेटली आली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही जोडी नव्याने प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. गौरी ही नात्यांना आणि भावनांना महत्व देणाऱ्या आरोहीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका सादर करणार आहे.

खऱ्या आयुष्यात संग्राम त्याच्या तन्मय या व्यक्तिरेखेपेक्षा खूप वेगळा आहे. संग्रामने या आधी साकारलेल्या सर्व भूमिका या ग्रामीण आणि रांगड्या होत्या, पण सूर राहू दे या मालिकेतून संग्राम एक अनोखी आणि त्याने आधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा एकदम वेगळी भूमिका सादर करत आहे. त्याची तन्मयची व्यक्तिरेखा हि अत्यंत व्यावहारिक मुलाची आहे. तो नेहमी फॉर्मल कपडे परिधान करतो आणि तितकाच वक्तशीर व शिस्तप्रिय आहे. दुसरीकडे संग्राम खऱ्या आयुष्यात खूप हॅपी गो लकी आहे. त्याला कॅज्युअली ड्रेसअप व्हायला आवडतं. प्रेक्षक आणि संग्रामच्या चाहत्यांना एक वेगळा संग्राम ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे.

त्याच्या या वेगळ्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना संग्राम म्हणाला, "मला खऱ्या आयुष्यात कॅज्युअल ड्रेसिंग स्टाईल आवडते पण तन्मयची व्यक्तिरेखा माझ्या अगदी विरुद्ध आहे. तन्मय हा एका आघाडीच्या फूड चैन ब्रँड मध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. तन्मय या व्यक्तिरेखेचं वैशिष्ट्य म्हणजे मी याआधी कधीच चष्मा वापरला नाही आहे, पण या भूमिकेसाठी मला चष्मा देखील वापरावा लागणार आहे. माझ्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक आहे पण प्रेक्षक नक्कीच मला दाद देतील अशी मी आशा करतो."

Web Title: 'Sur Rahu De' will be seen in the series 'Sangram Salvi' in different look