सुप्रिया विनोद यांना आली आशा काळेंची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 10:49 IST2017-07-25T05:19:00+5:302017-07-25T10:49:00+5:30

जुन्या काळातल्या मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे हे भारदस्त नाव. सोज्वळ, कष्टाळू स्त्रीच्या, गृहिणीच्या अनेक भूमिका आशाताईंनी अजरामर केल्या आहेत. ...

Supriya Vinod remembers Asha Kalle | सुप्रिया विनोद यांना आली आशा काळेंची आठवण

सुप्रिया विनोद यांना आली आशा काळेंची आठवण

न्या काळातल्या मराठी चित्रपटांमध्ये आशा काळे हे भारदस्त नाव. सोज्वळ, कष्टाळू स्त्रीच्या, गृहिणीच्या अनेक भूमिका आशाताईंनी अजरामर केल्या आहेत. बाळा गाऊं कशी अंगाई, आई पाहिजे, बंधन, लक्ष्मीची पावले. बंदिवान मी या सासरी यांसारखे त्यांचे चित्रपट खूप गाजले आहेत. त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. स्टार प्रवाहच्या 'गोठ' या मालिकेच्या सेटवर एका दृश्याच्या दरम्यान आशा काळे यांची आठवण सगळ्यांना झाली. एक सीन शूट करताना अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी आशाताईंच्या अभिनयाला सलाम केला. सुप्रिया सांगतात, 'तुळशीला हात जोडण्याचा मी 'गोठ'मध्ये सीन केला. त्यात मला आशाताई काळेंची आठवण आली. अशा प्रसंगात पूर्ण कन्व्हिक्शनने काम करण्यात त्या सर्वोत्तम होत्या. त्यांच्या सारखे काम करायला वेगळीच मजा आली. खरे तर मला तसे जमेलच असे नाही. पण एक प्रामाणिक प्रयत्न... त्यांना सलाम!'
स्टार प्रवाहवरील गोठ या मालिकेत 'कांचन' या भूमिकेचे वर्णन करताना सुप्रिया सांगतात, "मालिकेत भूमिका करण्याचा एक मोठा फायदा असतो. खूप वेगवेगळ्या छटा साकारायला मिळतात. चित्रपट किंवा नाटक आपल्याला जास्तीत जास्त तीन तास एक भूमिका रंगवायची संधी देतात. पण मालिकेतली भूमिका नट कित्येक तास जगतो. गोठ मलिकेने मला कांचन म्हणून जगायची फार सुंदर संधी दिली आहे. जशी मी नाही, तशी ही कांचन आहे! खूप अंतर्मुख, साध्या साध्या आनंदांपासूनही वंचित, मानसिकदृष्टया दुर्बल... एक वेगळी सुंदर भूमिका... खूप छटा असलेली." त्यांची भूमिका आणि आशा काळे यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये हेच साम्य असल्याचे मला वाटते.

Also Read : गोठ फेम सुप्रिया विनोद यांनी काढले हेअर ड्रेसर आणि रूपल नंदचे स्केच

Web Title: Supriya Vinod remembers Asha Kalle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.