शूटिंगसाठी राजस्थानला नेलं अन् किडनॅप केलं; सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला धक्कादायक प्रसंग, कसे वाचले प्राण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:20 IST2026-04-08T17:19:40+5:302026-04-08T17:20:08+5:30

शूटिंगसाठी राजस्थानला गेल्यानंतर सुप्रिया पाठारे यांना निर्मात्याने ३ महिने किडनॅप करून ठेवलं होतं. १९९५मध्ये त्यांच्यासोबत हा प्रसंग घडला होता. बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांची सुखरुप सुटका झाली होती. एका मुलाखतीत त्यांनी हा प्रसंग सांगितला होता. 

supriya pathare birthday special actress once get kidnapped by producer in rajsthan | शूटिंगसाठी राजस्थानला नेलं अन् किडनॅप केलं; सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला धक्कादायक प्रसंग, कसे वाचले प्राण?

शूटिंगसाठी राजस्थानला नेलं अन् किडनॅप केलं; सुप्रिया पाठारेंसोबत घडलेला धक्कादायक प्रसंग, कसे वाचले प्राण?

सुप्रिया पाठारे या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. सुप्रिया यांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पण, त्यांच्यासोबत एक असा प्रसंग घडला होता. जो ऐकला की आजही अंगावर काटा उभा राहतो. शूटिंगसाठी राजस्थानला गेल्यानंतर सुप्रिया पाठारे यांना निर्मात्याने ३ महिने किडनॅप करून ठेवलं होतं. १९९५मध्ये त्यांच्यासोबत हा प्रसंग घडला होता. बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांची सुखरुप सुटका झाली होती. एका मुलाखतीत त्यांनी हा प्रसंग सांगितला होता. 

"एक निर्माता होता जो शुटिंगच्या निमित्ताने मला राजस्थानला घेऊन गेला होता. तिथे तीन महिने त्याने मला डांबून ठेवलं. शूटिंगसाठी मी एकटीच इकडून गेले होते. त्या व्यक्तीने तब्बल तीन महिने बंदुकीचा धाक दाखवून माझ्याकडून अभिनय करुन घेतला. त्याने मला कुटुंबियांशी फोनवरुन बोलण्याची  परवानगी दिली होती. मात्र, तो मला मराठीत बोलू देत नव्हता. या परिस्थितीमध्ये मी कसंबसं करत कोड लँग्वेजचा वापर करुन माझ्या बहिणीला माझ्यावर ओढावलेल्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर माझ्या कुटुबियांनी बाळासाहेब ठाकरे याच्याकडे मदत मागितली", असं सुप्रिया पाठारेंनी सांगितलं होतं. 

पुढे त्या म्हणाल्या, "बाळासाहेबांना ही गोष्ट कळल्यानंतर राजस्थान पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलं आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. एक दिवस राजस्थान पोलिसांतील शिपाई माझ्या शोधात आले आणि त्यांनी माझी सुटका केली. त्यानंतर मला कळलं की, या सगळ्या प्रकारात बाळासाहेबांनी जातीने लक्ष घातलं होतं. त्यामुळे मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहीन."

Web Title : राजस्थान में शूटिंग के दौरान सुप्रिया पाठारे का अपहरण; बालासाहेब ठाकरे ने बचाया

Web Summary : मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे को 1995 में राजस्थान में एक शूटिंग के दौरान तीन महीने के लिए अपहरण कर लिया गया था। एक निर्माता ने उसे कैद कर लिया, फिर बालासाहेब ठाकरे ने हस्तक्षेप किया और राजस्थान पुलिस की मदद से उसे सुरक्षित बचाया। वह हमेशा उनकी आभारी रहेंगी।

Web Title : Supriya Pathare Kidnapped During Rajasthan Shoot; Balasaheb Thackeray Rescued Her

Web Summary : Marathi actress Supriya Pathare was kidnapped for three months during a shoot in Rajasthan in 1995. A producer held her captive until Balasaheb Thackeray intervened and ensured her safe rescue with the help of Rajasthan police. She remains grateful to him.