सुपरहिट गाणी नव्या ढंगात 'सरगम'च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 11:26 IST2017-02-28T05:50:08+5:302017-02-28T11:26:25+5:30
'सरगम' हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा शो रसिकांच्या भेटीला येत आहे.महाराष्ट्राचे आवडते संगीतकार, गायक, त्यांची आवडती आणि सुपरहिट गाणी एका ...

सुपरहिट गाणी नव्या ढंगात 'सरगम'च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला
' ;सरगम' हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा शो रसिकांच्या भेटीला येत आहे.महाराष्ट्राचे आवडते संगीतकार, गायक, त्यांची आवडती आणि सुपरहिट गाणी एका नव्या रंगात - ढंगात आणि एका नव्या स्वरूपात , सरगम या कार्यक्रमाद्वारे रसिकांना ऐकायला मिळतील.
![]()
या शोचा प्रवासाचा पहिला भाग ,शंकर महादेवन या दिग्गज संगीतकाराच्या सुमधुर संगीताने सुरु होईल. या कार्यक्रमात शंकर महादेवन गणपती नमन,सूर निरागस हो, परमेश्वरम,या रे इलाही,पर्वतदिगार, बगळ्यांची माळ अरुणिकिरणी,ब्रेथलेस हि आणि अशी अनेक गाजलेली गाणी आपल्याला एका वेगळ्या तालासुरात अनुभवायला मिळतील.
![]()
त्यांची दोन्ही मुले सिद्धार्थ महादेवन आणि शिवम महादेवन हेही या कार्यक्रमात त्यांना साथ देत आहेत.राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे हे सुद्धा या भागात शंकर महादेवन यांच्याबरोबर आपल्या सुरांची साथ देणार आहेत.लोक गीते,फोक संगीत,नाट्य संगीत जुनी गाजलेली गाणी,त्यांचे आजच्या काळातील तंत्रज्ञानाने बनवलेली नवीन रूप,संगीत क्षेत्रातील नवीन टॅलेंटचा शोध,जुन्या गाण्यांना आजच्या संगीतमय मंडळींनी दिलेली मानवंदना असं बरच काही या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.या कर्यक्रमाद्वारे संगीत क्षेत्रातील दिग्गज लोकांचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला पहायला मिळेल.त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील शिष्य त्यांच्या गुरूंना एक आदरांजली देणार आहेत.त्याच प्रमाणे अनेक नवोदित कलाकारांना पहिल्यांदा मोठ्या प्लॅटफॉर्मवर स्वतःला सिद्ध करण्याची संधीसुद्धा मिळणार आहे.विशेष म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळविल्यानंतर अभिनेत्री उर्मिला कोठारे आता छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. सरगम या कार्यक्रमाची सूत्रसंचाल उर्मिला कोठारे करणार आहे.