'सुपर 30' हि टीव्ही अभिनेत्री साकारणार ऋतिक रोशनच्या पत्नीची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 14:41 IST2017-12-28T09:11:33+5:302017-12-28T14:41:33+5:30

अभिनेता ऋतिक रोशन स्वत:ला सुपर 30 साठी तयार केले आहे. तसेच चित्रपटातील इतर भूमिकांसाठी निवड सुद्धा सुरु झाली आहे. ...

'Super 30' role of Rishi Roshan's wife to become a TV actress! | 'सुपर 30' हि टीव्ही अभिनेत्री साकारणार ऋतिक रोशनच्या पत्नीची भूमिका!

'सुपर 30' हि टीव्ही अभिनेत्री साकारणार ऋतिक रोशनच्या पत्नीची भूमिका!

िनेता ऋतिक रोशन स्वत:ला सुपर 30 साठी तयार केले आहे. तसेच चित्रपटातील इतर भूमिकांसाठी निवड सुद्धा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऋतिक रोशनच्या अपोझिट या चित्रपटातील अभिनेत्रीचे नाव निश्चित झाले आहे. टीव्ही अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींनी ऑडिशन दिले होते. मात्र मृणाल ठाकूरचे नाव फायनल करण्यात आले आहे. मृणालने कुमकुम भाग्य में या मालिकेत बुलबुलची भूमिका साकारली होती. मृणाल सुपर 30 मध्ये ऋतिक रोशनच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.   

या चित्रपटाची निर्माता विकास बहल आणि कास्टिंग दिग्दरर्शक मुकेश छाबराने जवळपास 15000 स्टुडेंट्सने ऑडिशन घेतले होते. त्यातल्या 79 लोकांची निवड करण्यात आली. मृणाल ठाकूर तिच अभिनेत्री आहे जिने आमिर खानच्या ठग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये काम करण्यास नकार दिला होता. आमिर खानला मृणाला फातिमा सना शेखची भूमिका द्यायची होती मात्र काही कारणमुळे तसे होऊ शकलेले नाही. ऐवढेच नाही तर तिने सलमान खानचा चित्रपट सुल्तानसाठी सुद्धा ऑडिशन दिले होते मात्र कास्टिंग दिग्दर्शने अनुष्का शर्माला साईन केले.  

सुपर 30 चित्रपट प्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंद कुमारा यांच्या आयुष्यावर आधारित आहेत. आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून  निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात. चित्रपटात ही भूमिका ऋतिक रोशन साकारणार आहे. 

Web Title: 'Super 30' role of Rishi Roshan's wife to become a TV actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.