सुनीला घाबरतेय होळीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 22:56 IST2016-03-26T03:33:47+5:302016-03-25T22:56:40+5:30

होळी हा सण लहानमोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद देत असतो. या सणाचे सर्वांनाच आकर्षण असते, मात्र ‘पुढचं पाऊल’ मधली अवंतिका म्हणजेच ...

Sunny feared Holi | सुनीला घाबरतेय होळीला

सुनीला घाबरतेय होळीला

ळी हा सण लहानमोठ्यांपर्यंत सर्वांनाच आनंद देत असतो. या सणाचे सर्वांनाच आकर्षण असते, मात्र ‘पुढचं पाऊल’ मधली अवंतिका म्हणजेच अभिनेत्री सुनीला करंबेळकर होळीला खूप घाबरते.

खरं तर होळी विषयी तिच्या मनात काही घृणा नाही. मात्र चार  वर्षापूर्वीच्या घटनेने तिच्या मनात होळीविषयी दहशतच निर्माण झालीय. 
याबाबत सुनीला सांगतेय की, ‘होळीच्या दोन दिवस अगोदरची ती सकाळ होेती. मी माझ्या कुत्र्याला घेऊन मॉर्निंग वॉकला निघाले होते. आणि अचानक एका खिडकीतून फुगा आला.

कदाचित त्या व्यक्तिंना मस्ती म्हणून माझ्यावर मारायचा होता. पण त्याचा नेम चुकला आणि तो माझ्या कुत्र्याच्या डोळ्याला लागला. एवढा जोेरात लागला की, त्याचा डोळा आता आयुष्यभरासाठी आंधळा झाला आहे’ 
सुनीला पूढे म्हणते की, आपल्या क्षणिक मजेसाठी तुम्ही कोणच्याही जीवाशी खेळणं अमानूषपणाच आहे. म्हणून मी होळीपासून चारहात लांबच राहते. 

Web Title: Sunny feared Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.