​सुनील पाल सांगतोय, याच व्यक्तींमुळे बंद झाला द कपिल शर्मा शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 13:12 IST2017-09-06T07:42:32+5:302017-09-06T13:12:32+5:30

द कपिल शर्मा शो बंद झाल्यामुळे या कार्यक्रमाच्या फॅन्सना जितका धक्का बसला आहे, तितकाच धक्का या कार्यक्रमात काम करणाऱ्या ...

Sunil Pal is telling, The Kapil Sharma show closed due to the same person | ​सुनील पाल सांगतोय, याच व्यक्तींमुळे बंद झाला द कपिल शर्मा शो

​सुनील पाल सांगतोय, याच व्यक्तींमुळे बंद झाला द कपिल शर्मा शो

कपिल शर्मा शो बंद झाल्यामुळे या कार्यक्रमाच्या फॅन्सना जितका धक्का बसला आहे, तितकाच धक्का या कार्यक्रमात काम करणाऱ्या लोकांना बसला आहे. द कपिल शर्मा शो हा गेल्या काही दिवसांपर्यंत टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल होता. त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेईल असे कोणाला वाटले नव्हते. पण या कार्यक्रमाने काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. कपिल शर्मा हा या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत खूपच खराब असल्याने चित्रीकरण करणे त्याच्यासाठी शक्य नाहीये आणि त्याचमुळे सोनी वाहिनीने काही दिवसांसाठी हा कार्यक्रम बंद करण्याचे ठरवले आहे. 

kapil sharma sunil grover
सोनी वाहनीच्या या निर्णयामुळे या कार्यक्रमात काम करणाऱ्या सुनील पालला चांगलाच धक्का बसला आहे. हा कार्यक्रम बंद झाल्यामुळे त्याला खूप राग देखील आला आहे आणि त्याने त्याचा हा राग कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यावर काढला आहे. त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम बंद पडला असे सुनील पालचे म्हणणे आहे. कपिल आणि सुनील दोघांनी एकत्र यावे, हेच या कार्यक्रमासाठी चांगले आहे असे त्या दोघांना सांगूनही त्यांनी ती गोष्ट न केल्यानेच हा कार्यक्रम बंद करण्याची आज वेळ आली असल्याचे सुनील पालचे म्हणणे आहे. त्याने युट्युबला एक व्हिडिओ पोस्ट करून आपले मत मांडले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तो सांगतो, सुनील आणि कपिल हे दोघे कॉमेडीची दोन चाके असल्याने त्यांनी दोघांनी एकत्र यावे. ते दोघे एकत्र आल्यास ते कॉमेडीला खूप पुढे घेऊन जातील असे मी त्यांना अनेकवेळा सांगितले होते. पण त्यांनी दोघांनीही माझे ऐकले नाही. तुम्ही आता खूश आहात का? तुमच्या दोघांच्या मनाला शांती मिळाली का? असे मला त्यांना विचारायचे आहे. 

Also Read : ​तर 'या' व्यक्तिमुळे बंद झाला कपिल शर्माचा शो!

Web Title: Sunil Pal is telling, The Kapil Sharma show closed due to the same person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.