कपिल शर्माच्या चाहत्यावर असा भडकला सुनील ग्रोव्हर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 12:57 IST2018-12-13T12:56:41+5:302018-12-13T12:57:16+5:30

 कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दुसरीकडे कपिलचा जुना सहकारी सुनील ग्रोव्हर यानेही ‘कानपूर वाले खुरानाज्’ या नव्या शोची तयारी सुरू केली आहे. पण त्याचा हा नवा शो सुरु होण्यापूर्वीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

sunil grover slam troller who targets his upcoming tv show kanpur waale khuranas |  कपिल शर्माच्या चाहत्यावर असा भडकला सुनील ग्रोव्हर!

 कपिल शर्माच्या चाहत्यावर असा भडकला सुनील ग्रोव्हर!

ठळक मुद्देयेत्या १५ डिसेंबरपासून शो सुरू होतोय. शोचा प्रोमोही आऊट झालाय. रणवीर सिंग व रोहित शेट्टी या शोमध्ये पहिले गेस्ट म्हणून असणार आहेत.

 कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दुसरीकडे कपिलचा जुना सहकारी सुनील ग्रोव्हर यानेही ‘कानपूर वाले खुरानाज्’ या नव्या शोची तयारी सुरू केली आहे. पण त्याचा हा नवा शो सुरु होण्यापूर्वीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. येत्या १५ डिसेंबरपासून शो सुरू होतोय. शोचा प्रोमोही आऊट झालाय. रणवीर सिंग व रोहित शेट्टी या शोमध्ये पहिले गेस्ट म्हणून असणार आहेत. आत्तापर्यंत आलेले शोचे सगळे प्रोमो हिट झाले आहेत. अर्थात काही जणांनी मात्र हे प्रोमो अजिबात रूचलेले नाही. अशाच एका इंटरनेट युजरने हे प्रोमो पाहून सुनील ग्रोव्हरला लक्ष्य केले. या युजरने सुनीलची कपिल शर्माशी तुलना केली. केवळ इतकेच नाही तर  सुनीलवर कपिलची कॉपी करण्याचा आरोपही केला. आता याने सुनील ग्रोव्हर भडकणार नाही तर नवल. त्याने कपिलशी तुलना करणा-या या युजरला चांगलेच आडव्या हाताने घेतले.



‘तू कोण आहेत? संपूर्ण अकाऊंट केवळ एक ट्वीट करणारा.  कमीत कमी तुझी ओळख तर सांग. आम्ही केवळ लोकांच्या चेह-यावर हास्य पाहू इच्छितो. यात काय चुकीचे आहे. शो बघून मग निर्णय घे. माझा इतका द्वेष करतोस तर माझ्यावर इतके लक्ष का देतोस?,’ अशा शब्दांत सुनीलने या युजरला फटकारले.



युजरचे ट्वीट बॅन करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही ते केवळ सुनील ग्रोव्हरच्या अकाऊंट जावूनचं वाचू शकता. पण सुनील ग्रोव्हर म्हणतो, ते एकाअर्थी ठीक आहे. ज्याच्याबद्दल राग असेल तर त्याकडे बघायचेच कशाला?

Web Title: sunil grover slam troller who targets his upcoming tv show kanpur waale khuranas