"चंद्रकांता मधील ‘सूर्या’ अगदी माझ्यासारखीच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 15:31 IST2017-11-10T10:01:33+5:302017-11-10T15:31:33+5:30

 चंद्रकांता मध्ये सूर्याची भूमिका करण्यासाठी पूजा बॅनर्जी सज्ज झाली आहे. तिच्या भूमिकेविषयी बोलताना ती म्हणाली, “या विस्मयकारक शो मध्ये ...

'Sun' in Chandrakant is like '' Like me '' | "चंद्रकांता मधील ‘सूर्या’ अगदी माझ्यासारखीच"

"चंद्रकांता मधील ‘सूर्या’ अगदी माझ्यासारखीच"

 
ंद्रकांता मध्ये सूर्याची भूमिका करण्यासाठी पूजा बॅनर्जी सज्ज झाली आहे. तिच्या भूमिकेविषयी बोलताना ती म्हणाली, “या विस्मयकारक शो मध्ये सहभागी झाल्यामुळे खूप छान वाटत आहे. मी घोड्यावर बसत आहे आणि अॅक्शन सीन सुद्धा करत आहे. चंद्रकांता मध्ये काम करणे म्हणजे प्रत्येक दिवस एक साहस आहे.मी चित्रीकरणाच्या प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटत आहे. सूर्याची व्यक्तिरेखा स्वतःचाच विचार करणारी आहे, पण त्याच वेळी तिचे मन मोठे आहे आणि ती प्रत्येकाची काळजी घेते. ती अतिशय उत्साही आहे आणि बडबडी आहे. मी वैयक्तिक रित्या जशी आहे तशीच ती आहे”

सूर्या ही एक तरूण मुलगी आहे, जी अजिबात विचार न करता बोलते आणि खूप काळजी घेतली गेलेली, बिघडलेली श्रीमंत मुलगी आहे.  

उर्वशी ढोलकियाने या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. 2015मध्ये ती बडी दूर से आये है या मालिकेत झळकली होती. पण गेल्या दोन वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. आता ती चंद्रकांता या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिकेतय ती या मालिकेत चेटकिणीची भूमिका साकारते आहे.   एकता कपूरच्या चंद्रकांता या मालिकेत उर्वशी ढोलकिया झळकणार आहे. उर्वशीने वक्त की रफार या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती देख भाई देख या मालिकेत झळकली. या मालिकेतील शिल्पा या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर घर एक मंदिर, कभी सौतन कभी सहेली यांसारख्या मालिकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या. पण खऱ्या अर्थाने तिला कसौटी जिंदगी की या मालिकेने प्रसिद्धी दिली. या मालिकेतील कोमोलिका ही तिची भूमिका चांगलीच गाजली होती.उर्वशीने खूपच कमी वयात लग्न केले होते. तिला दोन जुळी मुले असून ती आता 21 वर्षांची आहेत. मुलांना वेळ देण्यासाठीच तिने काही काळांचा ब्रेक घेतला होता. 

Web Title: 'Sun' in Chandrakant is like '' Like me ''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.